अकबर बलात्कारी होता, मीना बाजारमधून आणायचा सुंदर महिला; महान म्हणू नका - भाजपा मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 05:03 PM2024-02-26T17:03:07+5:302024-02-26T17:05:30+5:30

'अकबार कधीही महान नव्हता. तो एक आक्रमक आणि बलात्कारी होता. तो मीना बाजार चलवायचा आणि तेथून सुंदर महिलांना आणून बलात्कार कारयाचा. अशा व्यक्तीला महान म्हणने मूर्खपणा आहे.'

Akbar was a rapist says rajasthan education minister madan dilawar | अकबर बलात्कारी होता, मीना बाजारमधून आणायचा सुंदर महिला; महान म्हणू नका - भाजपा मंत्री

प्रतिकात्मक फोटो...

अकबर कधीच महान नव्हता. तो एक आक्रमक आणि बलात्कारी होता. तो मीना बाजार चालवायचा आणि तेथून सुंदर महिला आणायचा, असे राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी म्हटले आहे. ते रविवारी बलोत्रा येथे एका मंदिरात गेले होते. यावेळी त्यांना राज्यातील पाठ्यपुस्तकांतील अकबराच्या धड्यासंदर्भात प्रश्न विचारला असता, त्यांनी हे भाष्य केले.

पत्रकारांसोबत बोलताना दिलावर म्हणाले, 'अकबार कधीही महान नव्हता. तो एक आक्रमक आणि बलात्कारी होता. तो मीना बाजार चलवायचा आणि तेथून सुंदर महिलांना आणून बलात्कार कारयाचा. अशा व्यक्तीला महान म्हणने मूर्खपणा आहे.' यापूर्वीही शालेय पाठ्यपुस्तकांतील बदलासंदर्भात बोलताना, कुठलाही बदल करायचा नाही, मात्र काही चुकीच्या गोष्टी काढायच्या आहेत, असेही त्यांनी म्हटले होते.

दिलावर यांनी 30 जानेवारीच्या एका पत्रकार परिषदेत म्हटले होते की, 'आम्हाला पाठ्यपुस्तकात बदल करण्याची आवश्यकता नाही, मात्र चुकीची अथवा महान लोकांचा अपमान करणारी माहिती काढून टाकली जाईल. शिवाजी महाराज आणि वीर सावरकर यांसारख्या आपल्या पूर्वजांबद्दल बरीच चुकीची माहिती आहे. त्या गोष्टी दुरुस्त केल्या जातील.' 

'अनेक पुस्तकात म्हण्यात आले आहे की, सावरकर देशभक्त नव्हते. तर अकबराला महान म्हणण्यात आले आहे. शिवाजी महाराजांना 'पहाडी चूहा' म्हटले गेले तर महाराणा प्रतापांच्या भूमिकेला अकबरासमोर कमी दाखविण्यात आले आहे. अशा गोष्टी स्वीकारल्या जाऊ शकत नाहीत आणि त्याची समीक्षा केले जाईल,' असेही दिलावर यांनी म्हटले आहे.
 

Web Title: Akbar was a rapist says rajasthan education minister madan dilawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.