अखिलेशच बनणार सुलतान? यादव झाले 'मुलायम'

By admin | Published: January 10, 2017 03:04 PM2017-01-10T15:04:37+5:302017-01-10T15:16:39+5:30

मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्यातील वाद संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंगळवारी यादव पिता-पुत्रांमध्ये जवळपास दोन तास बैठक झाली.

Akhilesh become the Sultan? Yadav becomes 'Mulayam' | अखिलेशच बनणार सुलतान? यादव झाले 'मुलायम'

अखिलेशच बनणार सुलतान? यादव झाले 'मुलायम'

Next

ऑनलाइन लोकमत

लखनौ, दि. 10 - मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्यातील वाद संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंगळवारी यादव पिता-पुत्रांमध्ये जवळपास दोन तास बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षातर्फे अखिलेशच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील, असा विश्वास मुलायम सिंह यांनी अखिलेश यांना दिला. तर पक्षाचे अध्यक्षपदावर मुलायमसिंह स्वतः कायम राहतील, असेही त्यांनी बैठकीदरम्यान सांगितले. मुलायमसिंह यादव यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. 
 
शिवाय मुलायम सिंह यांनी अखिलेश यांना निवडणूक आयोगाला दिलेले पत्रही मागे घेण्यासाठी सांगितल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बैठक संपल्यानंतर अखिलेश यांनी कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात करायला सांगितले. मात्र, पक्षातील कोणत्याही नेत्याकडून अद्यापपर्यत याबाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. 
(राज ठाकरे नरमले, युतीला तयार)
 
तर दुसरीकडे, यादव पिता-पुत्रांची बैठक सुरू असताना शिवपाल यादव यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना अखिलेश यादवा यांना मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून संबोधन टाळले. मुलायम सिंह जो निर्णय घेतील तो मान्य करू, असे वक्तव्य शिवपाल यादव यांनी केले.  
(मुलायमचा यू-टर्न!)
 
'समाजवादी पार्टी एकसंघ असून फूट पडण्याचा प्रश्न नाही, सत्ता आल्यास अखिलेश हेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील', असा ठाम दावा समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांनी सोमवारी केला होता. आमच्या दोघांत कोणताही वाद वा मतभेद नसल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला. माझ्या मुलाला फितविण्यामागे एक-दोन व्यक्ती आहेत. त्यामुळेच पक्षात पेच निर्माण झाला. उमेदवारांच्या फॉर्म ए आणि बी’वर माझीच सही असेल, असंही मुलायमसिंह म्हणाले होते. 
 

Web Title: Akhilesh become the Sultan? Yadav becomes 'Mulayam'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.