अखिलेश हे समाजवादी नव्हे तर नमाजवादी, अमरसिंहांचा थेट हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 05:44 AM2018-08-26T05:44:38+5:302018-08-26T05:45:18+5:30

विष्णू मंदिराचा मुद्दा : अमरसिंग यांचा थेट हल्लाबोल

Akhilesh is not Samajwadi but Namajwadi, Amar Singh's direct attack | अखिलेश हे समाजवादी नव्हे तर नमाजवादी, अमरसिंहांचा थेट हल्लाबोल

अखिलेश हे समाजवादी नव्हे तर नमाजवादी, अमरसिंहांचा थेट हल्लाबोल

Next

नवी दिल्ली : अखिलेश हे समाजवादी पक्षाचे नव्हे तर नमाजवादी पक्षाचे अध्यक्ष आहेत, या शब्दांत राज्यसभा सदस्य अमरसिंग यांनी टीकास्त्र सोडल्याने समाजवादी पक्षातील वाद आणखी बिकट बनला आहे. निवडणूक जिंकल्यास विष्णू मंदिर उभारण्याची घोषणा अखिलेश यादव यांनी केल्यानंतर अमरसिंग यांनी फेसबुकवर व्हिडिओ जारी करीत त्यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते आझम खान यांनाही लक्ष्य बनविले.

अखिलेश यादव, तुम्हाला विष्णू मंदिर बांधण्याचा अधिकार आहे काय? असा सवाल करीत अमरसिंग म्हणाले की, तुम्ही समाजवादी पार्टीचे नव्हे तर नमाजवादी पार्टीचे अध्यक्ष आहात. तुम्ही आणि तुमच्या वडिलांनी उभे केलेले राजकीय पुत्र मोहम्मद आझम खान यांनी माझ्यासारख्यांना कापून टाकण्याची आणि माझ्या तरुण मुलीवर तेजाब फेकण्याची भाषा केली आहे. मुली तुम्हालाही आहेत. तुमच्या कुटुंबातही मुली आहेत. अन्य कुटुंबातून आलेल्या सुनाही आहेत. यादव यांच्या घराण्यातील कौटुंबिक वाद सोडविल्यानंतरही माझ्या कठीण प्रसंगी अखिलेश आणि मुलायमसिंग यांच्या संपूर्ण परिवाराने साथ दिलेली नाही, अशी खंतही अमरसिंग यांनी बोलून दाखविली. तुम्ही पालनपोषण केलेला, तुम्ही जन्माला घातलेला तैमूरलंग, अलाऊद्दीन खिलजी, नादीरशाह आणि मोहम्मद गजनवीच्या वंशाचा आणि संस्कृतीचा राक्षस आझम खान आमच्या मुलींना तेजाबची आंघोळ घालण्याची आणि आम्हाला कापून टाकण्याची भाषा करतो.
मला कुणीही सांप्रदायिकतावादी म्हणत असेल तर मान्य आहे. मी धर्मनिरपेक्षतेसाठी स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही. मी मुस्लिमांचा सन्मान करतो, मात्र आझम खान यांच्यासारख्यांचा नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

Web Title: Akhilesh is not Samajwadi but Namajwadi, Amar Singh's direct attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.