अखिलेशच होणार मुख्यमंत्री - मुलायम
By admin | Published: January 9, 2017 11:02 PM2017-01-09T23:02:08+5:302017-01-09T23:37:29+5:30
निवडणुकीनंतर अखिलेश यादव हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांनी
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 9 - उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीवर घोंगावणार समाजवादी पक्षाचं वादळ काहीसं शांत होताना दिसत आहे. निवडणुकीनंतर अखिलेश यादव हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांनी केली आहे.
पक्ष फुटण्याचा काही प्रश्नच येत नाही, आम्ही सर्व एक आहोत लवकरच निवडणूक प्रचाराला सुरूवात करणार आहोत. पक्षाच्या अखंडतेसाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत असं पक्ष फुटण्याच्या प्रश्नावर बोलताना मुलायम म्हणाले. पक्षामध्ये मतभेद आहेत पण काळजी करण्याचं कारण नाही हे त्यांनी यापुर्वी मान्य केलं आहे. यासाठी एक व्यक्ती जबाबदार असल्याचं ते म्हणाले. उत्तरप्रदेशच्या भल्यासाठी समाजवादी पक्ष एकजूट आहे , अखिलेश हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील असं मुलायम म्हणाले.
#WATCH Akhilesh Yadav will be the Chief Minister after the elections.No question of the party splitting:Mulayam Singh Yadav to ANI pic.twitter.com/Kosj5ZFwwc
— ANI UP (@ANINewsUP) 9 January 2017
यापुर्वी पक्षामध्ये सुरू असलेल्या कलहाच्या पार्श्वभुमीवर मुलायम यांनी शिवपाल यादव आणि अमर सिंग यांच्यासह आगामी निवडणुकीत सायकलचं चिन्ह मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. तर अखिलेश यादव यांच्या गटानेही निवडणुक आयोगाकडे हजेरी लावून पक्षाच्या चिन्हासाठी दावा सांगितला होता.