Vikas Dubey Encounter : "सरकार पलटी होऊ नये म्हणून कार पलटली", अखिलेश यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 11:01 AM2020-07-10T11:01:58+5:302020-07-10T11:04:52+5:30

Vikas Dubey Encounter : विकास दुबे ठार झाल्यानंतर अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. एन्काऊंटरवरून सरकारवर निशाणा साधला आहे. 

akhilesh yadav attacks yogigovernment over vikas dubey encounter raises question | Vikas Dubey Encounter : "सरकार पलटी होऊ नये म्हणून कार पलटली", अखिलेश यांचा हल्लाबोल

Vikas Dubey Encounter : "सरकार पलटी होऊ नये म्हणून कार पलटली", अखिलेश यांचा हल्लाबोल

Next

Vikas Dubey Encounter : "सरकार पलटी होऊ नये म्हणून कार पलटली", अखिलेश यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली - आठ पोलिसांची हत्या घडवणारा गँगस्टर विकास दुबे शुक्रवारी (10 जुलै) सकाळी एन्काऊंटरमध्ये ठार झाला आहे. मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये विकास दुबेला काल अटक करण्यात आली. आज त्याला कानपूरला नेलं जात असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. यानंतर विकास दुबेनं पोलिसांकडील बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत विकास दुबे ठार झाला आहे. समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दुबे एन्काऊंटरवरून सरकारवर निशाणा साधला आहे. 

विकास दुबे ठार झाल्यानंतर अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. "सरकार पलटी होऊ नये म्हणून कार पलटली" असं म्हणत योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. "कार पलटी झाल्यावर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला हे स्पष्टीकरण संभ्रमात टाकणारे आहे. पळून जायचे होते तर त्याने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन का केले?, कार पलटी झालेली नाही तर सरकार पलटी होण्यापासून वाचवण्यासाठी हा सर्व प्रकार घडवून आणला आहे" असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे. 

अखिलेख यादव यांनी गुरुवारीही ट्विट करुन अनेक प्रश्न उपस्थित केले होते. विकास दुबेला अटक करण्यात आली की, त्याने शरणागती पत्कारली याचा भांडाफोड होणं गरजेचं आहे. सरकारने याबाबत स्पष्टीकरण द्यावं, असेही अखिलेश यांनी म्हटलं होतं. तसेच, विकास दुबेच्या मोबाईलचे सीडीआर सार्वजनिक करणे गरजेचं आहे, त्यानंतर खऱ्या अर्थाने मिलिभगतचा भांडाफोड होईल, असे अखिलेश यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आज देखील सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. 

उत्तर प्रदेशात आठ पोलिसांची हत्या घडवणारा गँगस्टर विकास दुबे शुक्रवारी (10 जुलै) सकाळी एन्काऊंटरमध्ये ठार झाला आहे. एन्काऊंटरमध्ये गंभीर जखमी झालेल्या दुबेला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. विकास दुबेला काल मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये अटक करण्यात आली. आज त्याला कानपूरला नेलं जात असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. यानंतर विकास दुबेनं पोलिसांकडील बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत विकास दुबे ठार झाल्याची माहिती मिळत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Vikas Dubey Encounter : लेडी सिंघमने आवळल्या विकास दुबेच्या मुसक्या, जाणून घ्या नेमकं काय घडलं

CoronaVirus News : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! हिंदू कुटुंबाला दिला मुस्लिम महिलेचा मृतदेह, अंत्यसंस्कारानंतर आला फोन अन्...

CoronaVirus News : MASK लावायचा कंटाळा येतो?, 'हा' Video पाहिलात तर कधीच हटवणार नाहीत मास्क

CoronaVirus News : हँड सॅनिटायझरची खरेदी करताना 'या' गोष्टी चेक करता का?; FDAने दिला मोलाचा सल्ला

शरद पवारांच्या 'मातोश्री' भेटीवरुन आशिष शेलारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला टोला, म्हणाले...

Web Title: akhilesh yadav attacks yogigovernment over vikas dubey encounter raises question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.