अखिलेश यादव ज्या फांदीवर बसतात, ती फांदीच तोडून टाकतात : अमर सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 10:30 AM2019-06-25T10:30:47+5:302019-06-25T10:32:53+5:30
अमर सिंह सपासाठी निकटवर्तीय राहिले नाही. मात्र अधुनमधून ते सपामधील घडामोडींवर आपले मत मांडत असतात.
नवी दिल्ली - समाजवादी पार्टी आणि बहुजन समार पक्ष यांच्यातील युती तुटल्यानंतर मुलायम सिंह यादव यांचे निकटवर्तीय आणि माजी सपा नेता अमर सिंह यांनी माजी मुख्यमंत्री आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच त्यांना राजकारणातील कालिदास म्हणून संबोधले.
अमर सिंह म्हणाले की, अखिलेश यादव राजकारणातील कालिदास आहेत. ज्या फांदीवर बसतील तिलाच तोडून टाकतील. मायावतींचा हेतू साध्य झाला. त्यामुळे त्या निघून गेल्या. आता मुस्लीम मतांसाठी मायावती अखिलेश यादव यांच्यावर आरोप करत आहे. तसेच विरोधक आता गलिगात्र झाले आहेत. परंतु, अखिलेश यांनी ग्राउंड लेव्हलला जावून मेहनत घेतल्यास चित्र बदलू शकते, असंही त्यांनी म्हटले.
सपा-बसपा यांच्यातील युती तुटली असून त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मायावती यांनी घोषणा केली असून यापुढे होणाऱ्या निवडणुका बसपा स्वबळावर लढवणार आहे. पक्षाच्या राष्ट्रीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर सपाने देखील स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे जाहीर केले.
दुसरीकडे अमर सिंह सपासाठी निकटवर्तीय राहिले नाही. मात्र अधुनमधून ते सपामधील घडामोडींवर आपले मत मांडत असतात.