'कारसेवकांवर लाठीचार्ज, संविधानाचे पालन'; राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर अखिलेश यादव यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 08:02 PM2024-01-20T20:02:30+5:302024-01-20T20:03:19+5:30

जो संविधानाच्या बाजूने आहे त्याचा आदर केला जातो. तुम्ही शपथ घेता तेव्हा त्याचा सन्मान केलाच पाहिजे', असंही अखिलेश यादव म्हणाले. 

Akhilesh Yadav made reaction on Ram Mandir ceremony and Lathi Charge on Karsevaks | 'कारसेवकांवर लाठीचार्ज, संविधानाचे पालन'; राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर अखिलेश यादव यांनी स्पष्टच सांगितलं

'कारसेवकांवर लाठीचार्ज, संविधानाचे पालन'; राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर अखिलेश यादव यांनी स्पष्टच सांगितलं

अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची देशभरात जोरदार तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर जोरदार आरोप केले आहेत. 

 ३२ वर्षांपूर्वी अयोध्येत कारसेवकांवर झालेला लाठीचार्ज संविधानाला अनुसरून होता. जो संविधानाच्या बाजूने आहे त्याचा आदर केला जातो. तुम्ही शपथ घेता तेव्हा त्याचा सन्मान केलाच पाहिजे. अखिलेश यादव म्हणाले, अयोध्येत पहिल्यापासून हवाईपट्टी होती. समाजवादी सरकारच्या काळात विकास झाला आहे. ३२ वर्षांपूर्वी अयोध्येत कारसेवकांवर झालेला लाठीचार्ज संविधानाला अनुसरून होता. जो संविधानाच्या बाजूने आहे त्याचा आदर केला जातो. तुम्ही शपथ घेता तेव्हा त्याचा सन्मान केलाच पाहिजे', असंही अखिलेश यादव म्हणाले. 

अखिलेश यादव म्हणाले, अयोध्येत वातावरण तयार केले जात आहे. विकास कोणीही रोखू शकत नाही. अयोध्येत आधीच हवाई पट्टी होती. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना योग्य मोबदला मिळाला का? समाजवादी सरकारच्या काळात खूप विकास झाला. न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिर बांधले जात आहे. मंदिर बांधले तर कोणाला आनंद होणार नाही?, असा सवालही यादव यांनी केला.

"तुम्ही अयोध्येत विमानतळ बांधले, पण तुम्ही संपादित केलेल्या जमिनीच्या ६ पट मोबदला मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती, ती मिळाली का? रेल्वे स्थानके नेहमीच बांधली जात आहेत. ही चांगली गोष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राम मंदिर बांधले जात असल्याचे तुम्ही म्हणालात, ही आनंदाची गोष्ट आहे. पण, एक तरुण आपला बायोडाटा घेऊन फिरत होता, त्याला रोजगार हवा होता. 

'रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मला कोणाकडूनही निमंत्रण मिळालेले नाही. मी याबाबत बोलल्यानंतर मला अयोध्येहून स्पीड पोस्टने निमंत्रण मिळाले. राम मंदिराच्या उद्घाटन निमंत्रणावरुनही राजकारण केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

३२ वर्षांपूर्वी अयोध्येत कारसेवकांवर झालेला लाठीचार्ज संविधानाला अनुसरून होता. जो संविधानाच्या बाजूने आहे त्याचा आदर केला जातो. तुम्ही शपथ घेता तेव्हा त्याचा सन्मान केलाच पाहिजे. इंडिया आघाडी, पीडीए ही आमची रणनीती असल्याचे अखिलेश यादव म्हणाले. लोकसभा निवडणुकीत फक्त पीडीएच एनडीएचा पराभव करेल, असंही यादव म्हणाले.

Web Title: Akhilesh Yadav made reaction on Ram Mandir ceremony and Lathi Charge on Karsevaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.