अखिलेश यादव, रामगोपाल यादव यांची 'सपा'मध्ये घरवापसी

By admin | Published: December 31, 2016 02:10 PM2016-12-31T14:10:53+5:302016-12-31T14:35:12+5:30

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांची समाजवादी पक्षामध्ये घरवापसी झाली आहे.

Akhilesh Yadav, Ram Gopal Yadav's resignation in 'SP' | अखिलेश यादव, रामगोपाल यादव यांची 'सपा'मध्ये घरवापसी

अखिलेश यादव, रामगोपाल यादव यांची 'सपा'मध्ये घरवापसी

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांची समाजवादी पक्षामध्ये घरवापसी झाली आहे. अखिलेश यादव आणि रामगोपाल यांच्यावर 6 वर्षांसाठी करण्यात आलेली निलंबनाची कारवाई रद्द करण्यात आली आहे. शिवपाल यादव यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. 
 
मुलायमसिंह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत मुलायमसिंह यादव, आजम खान आणि स्वतः अखिलेश यादवदेखील उपस्थित होती. शनिवारी सकाळपासूनच उत्तर प्रदेशातील राजकारणात तासातासाला नाट्यमय घडामोडी घडत होत्या. यादव पिता-पुत्रांच्या बैठकांवर बैठक, शक्तीप्रदर्शन सुरू होते. याचदरम्यान, अखिलेश यांनी समर्थकांसोबत घेतलेली बैठक आटोपून वडील मुलायमसिंह यांची भेट घेतली.
 
मुलायमसिंह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर उत्तर प्रदेशातील 'दंगल'ने वेगळेच वळण घेतले. यानंतर काही वेळातच पत्रकार परिषद घेत शिवपाल यादव यांनी अखिलेश आणि रामगोपाल यांच्यावर निलंबनाची केलेली कारवाई मागे घेतली. 
दरम्यान, या बैठकीत जागा वाटप व अमर सिंह यांच्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. अमर सिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 
 
घरवापसी होण्याआधीच्या घडामोडी
समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यांच्यातील राजकीय संघर्ष निर्माण झाला असला तरी समर्थकांच्या बैठकीत वडिलांचे नावाच्या उल्लेख होताच अखिलेश भावूक झाले होते. एकीकडे अखिलेश यांना आमदारांचे मोठ्या प्रमाणात समर्थन मिळाले तर दुसरीकडे मुलायमसिंह यांनी पक्ष कार्यालयात बोलावलेल्या बैठकीत केवळ 18 आमदारच सहभागी झाले होते. बैठकीनंतर अखिलेश आजम खान यांच्यासोबत मुलायमसिंह यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले.  यावेळी भावूक होत अखिलेश यांनी मुलायमसिंह यांचे पाय स्पर्शून '2017 मधील उत्तर प्रदेश विधानसभा जिंकून तुम्हाला भेट देणार', असे सांगितले.
 
यादव पिता-पुत्रात आजम खान मध्यस्थी
समाजवादी पक्षाचे आजम खान पक्षाला अडचणीतून वाचवण्यासाठी मुलायमसिंह आणि अखिलेश यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. आजम यांनी शनिवारी सकाळी आधी मुलायमसिंह यांची भेट घेतली त्यानंतर अखिलेश यांना घेऊन मुलायमसिंह यांच्या निवासस्थानी पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजम यांनी पिता-पुत्रांची गळाभेट घडवली.
 
 

Web Title: Akhilesh Yadav, Ram Gopal Yadav's resignation in 'SP'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.