Akhilesh Yadav Tweet, Uttar Pradesh Assembly elections Result 2022: "इम्तिहान बाकी है अभी हौसलों का, वक्त आ गया है अब फैसलों का..."; अखिलेश यादव यांचं सूचक ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 09:42 AM2022-03-10T09:42:34+5:302022-03-10T09:46:24+5:30

सुरूवातीच्या कलांमध्ये योगींच्या भाजपाचे उमेदवार २०० जागांवर आघाडीवर

Akhilesh Yadav Tweet, Uttar Pradesh Assembly elections Result 2022: Akhilesh Yadav's suggestive tweet |  Akhilesh Yadav Tweet, Uttar Pradesh Assembly elections Result 2022: "इम्तिहान बाकी है अभी हौसलों का, वक्त आ गया है अब फैसलों का..."; अखिलेश यादव यांचं सूचक ट्वीट

 Akhilesh Yadav Tweet, Uttar Pradesh Assembly elections Result 2022: "इम्तिहान बाकी है अभी हौसलों का, वक्त आ गया है अब फैसलों का..."; अखिलेश यादव यांचं सूचक ट्वीट

googlenewsNext

Uttar Pradesh Assembly elections Result 2022, Akhilesh Yadav Tweet: देशाच्या राजकारणाची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारं राज्य असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये जनमत कोणाच्या बाजूने असेल ते गुरूवारी सकाळीच समजू लागले. उत्तर प्रदेशमध्ये एकूण ४०३ जागांवर मतदान झाले. सरकार स्थापनेसाठी २०२ एवढ्या बहुमताची गरज लागणार आहे. याचदरम्यान समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सुरूवातीचे कल हाती येत असताना सूचक ट्वीट केलं. 

धैर्याची मुख्य परीक्षा अजून शिल्लक आहे. आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. मतमोजणी केंद्रांवर रात्रंदिवस जागरुकपणे कार्यरत राहिल्याबद्दल सपा आणि मित्रपक्षांच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे, समर्थकांचे, नेत्यांचे, पदाधिकारी आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार! 'लोकशाहीचे शिपाई' आता विजयाचं प्रमाणपत्र घेऊनच परततील, अशा आशयाचं ट्वीट अखिलेश यादव यांनी केलं.

दरम्यान, सकाळी सुरूवातीच्या वेळेत उत्तर प्रदेशमध्ये २८८ जागांचे कल हाती आले. त्यात भाजपचे उमेदवार २०० मतदारसंघात आघाडीवर आहेत. तर सपा पिछाडीवर असून त्यांचे उमेदवार ७७ जागांवर आघाडीवर आहेत. याशिवाय बसपाचे ४, काँग्रेसचे ४ तर २ अन्य उमेदवार आघाडीवर आहेत.

Web Title: Akhilesh Yadav Tweet, Uttar Pradesh Assembly elections Result 2022: Akhilesh Yadav's suggestive tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.