... म्हणून अखिलेश यादव यांचे हेलिकॉप्टर दिल्लीत रोखले?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 08:39 AM2022-01-29T08:39:23+5:302022-01-29T08:40:04+5:30
अखिलेश यादव यांनी दिल्लीत हेलिकॉप्टर रोखल्याचा आरोप केला आहे. अखिलेश यादव यांना दिल्लीमार्गे मुझफ्फरनगर येथे प्रचारासाठी जायचे होते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे हेलिकॉप्टर दिल्लीत रोखल्याने पुन्हा एका वादाला तोंड फुटले आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवर माझ्या फॉलोअर्सवर नियंत्रण आणत असल्याचा आरोप केला आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या दबावातून हे होत असल्याचे त्यांनी ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
अखिलेश यादव यांनी दिल्लीत हेलिकॉप्टर रोखल्याचा आरोप केला आहे. अखिलेश यादव यांना दिल्लीमार्गे मुझफ्फरनगर येथे प्रचारासाठी जायचे होते. परंतु, बराच वेळ झाल्यानंतर हेलिकॉप्टरच्या उड्डाणाला विमानतळावरील अधिकाऱ्यांकडून अनुमती मिळत नव्हती. अखेर अखिलेश यादव यांनी ट्विट करून ही माहिती उघड केली. हेलिकॉप्टर समोर उभे असलेल्या छायाचित्रासोबत अखिलेश यादव यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “पराभव समोर दिसत असल्यामुळे भाजपचे नेते निराश झाले आहेत. सत्तेचा दुरुपयोग करून असा प्रकार करण्याची कृती इतिहासात नोंदली जाईल.”