मुलायम करतात अखिलेशचा मत्सर - रामगोपाल यांचा दावा

By Admin | Published: October 25, 2016 01:39 PM2016-10-25T13:39:35+5:302016-10-25T13:40:32+5:30

रामगोपाल यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यांची लोकप्रियता अधिक असल्याने मुलायम हे अखिलेश यांचा मत्सर करत असल्याचे विधान करून यादवांमधील वादाला वेगळे वळण दिले आहे.

Akhilesh's jealousy softens - Ramgopal's claim | मुलायम करतात अखिलेशचा मत्सर - रामगोपाल यांचा दावा

मुलायम करतात अखिलेशचा मत्सर - रामगोपाल यांचा दावा

googlenewsNext
 ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,  दि. 25 - समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यांच्या परिवारात सुरू अललेल्या यादवीचे दररोज नवनवे अंक सादर होत आहेत. आता सपामधून हकालपट्टी करण्यात आलेल्या रामगोपाल यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यांची लोकप्रियता अधिक असल्याने मुलायम हे अखिलेश यांचा मत्सर करत असल्याचे विधान करून या वादाला वेगळे वळण दिले आहे. तचेस अखिलेशशिवाय राज्यात सपाचे अस्तित्व उरणार नाही. त्यामुळेच अखिलेश हेच पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत, हे आपले ध्येय असल्याचे रामगोपाल यांनी सांगितले.  
 "आपला मुलगा हा आपल्यापेक्षा वरचढ व्हावा, असे प्रत्येक बापाला वाटत असते. पण आम्हा यादवांच्या कुटुंबात नेमके याच्या उलट घडत आहे. असे घडायला नको होते. जे काही घडत आहे ते अत्यंत वाईट आहे," असे रामगोपाल यादव म्हणाले. उत्तर प्रदेशातील सर्वात शक्तिशाली राजकीय कुटुंब असलेल्या यादव परिवारात समाजवादी पक्षातील वर्चस्वाच्या लढाईवरून उभी फूट पडली आहे. त्यात मुलायम आणि त्यांचा भाऊ शिवपाल यादव एकीकडे आहेत, तर अखिलेश यादव आणि मुलायम यांचे चुलत भाऊ रामगोपाल दुसरीकडे आहेत.
(मुलायमसिंह नव्हे चंद्र प्रकाश गुप्ता प्रतीकचे पिता)
समाजवादी पक्ष आणि यादव परिवारात सुरू असलेल्या वादासाठी रामगोपाल यांनी अमर सिंह यांना दोषी ठरवले आहे.  "काही लोकांनी नेताजींच्या मनात विष कालवले आहे," असे ते म्हणाले. तसेच सीबीआयची कारवाई टाळण्यासाठी भाजपाशी हातमिळवणी केल्याच्या आरोपाचेही रामगोपाल यांनी खंडन केले.  त्याबरोबरच सपामधून हकालपट्टी करण्यात आली असली तरी आपण राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
बरखास्त मंत्र्यांचे होणार पुनरागमन 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सरकारमधून बरखास्त केलेल्या काका शिवपाल यादव यांच्यासह चार मंत्र्यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होणार आहे. या मंत्र्यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान देण्यासाठी एक फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. अखिलेश यादव यांनी शिवपाल यादव नारद राय, शादाब फातिमा आणि ओमप्रकाश सिंह यांना रविवारी मंत्रिमंडळातून डच्चू दिला होता. त्यानंतर सोमवारी मुलायम यांनी फटकारल्यानंतर अखिलेश यांना माघार घ्यावी लागली आहे.  
 

 

Web Title: Akhilesh's jealousy softens - Ramgopal's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.