तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी अक्षयने मागितली माफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 01:44 PM2017-07-24T13:44:15+5:302017-07-24T13:44:15+5:30
तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने माफी मागितली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने माफी मागितली आहे. महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारत आणि इंग्लंड संघ आमने-सामने होते. लॉर्ड्सवर पार पडलेल्या या सामन्याला खिलाडी अक्षय कुमारने उपस्थिती लावली होती. यावेळी अक्षय कुमारने तिरंगा हातात घेतला होता. चुकीच्या पद्धतीने तिरंगा फडकावल्याने अक्षय कुमारवर टीकेची झोड उठली होती, ज्यानंतर त्याने माफी मागितली आहे.
संबंधित बातम्या
खिलाडी अक्षय कुमारने आपला एक फोटो ट्विट केला होता. या फोटोमध्ये अक्षय कुमार अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाला चिअर करताना दिसत होता. यावेळी त्याच्या हातात तिरंगादेखील होता. मात्र तिरंगा फडकवत असताना तो उलटा पकडला असल्याने सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. ते ट्विट अक्षय कुमारने डिलीट केलं आहे.
Extending my sincerest apology for violating the code of conduct for the tricolor.Didn't mean to offend anyone,the picture has been removed
— Akshay Kumar (@akshaykumar) July 24, 2017
अक्षय यासंबंधी एक नवीन ट्विट करत माफी मागितली आहे. "तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी मी माफी मागत आहे. कोणाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. फोटो काढून टाकण्यात आला आहे", असं अक्षय कुमारने ट्विटमध्ये सांगितलं आहे.
अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट "गोल्ड"साठी शूटिंग करत आहे. भारतीय हॉकी संघाने जिंकलेल्या पहिल्या सुवर्णपदकाची कथा या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे.
महिला विश्वचषकात स्वप्नवत कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचे विश्वचषकाला गवसणी घालण्याचे स्वप्न मात्र भंगले. मिताली राजच्या भारतीय संघाला अंतिम लढतीत इंग्लंडकडून 9 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारतावर मात करत इंग्लंडने विजेतेपदाला गवसणी घातली. महिला विश्वचषकातील इंग्लंडचे हे चौथे विश्वविजेतेपद आहे.
संपूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवल्यानंतरही अखेरच्या काही षटकांत फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारतीय महिला क्रिकेट संघावर हातातील विश्वविजेतेपद गमावण्याची वेळ आली. प्रथम फलंदाजी केलेल्या यजमान इंग्लंडला ५० षटकात ७ बाद २२८ धावांवर रोखल्यानंतर, भारताचे प्रयत्न ९ धावांनी कमी पडले. मुंबईकर पूनम राऊतने केलेली ८६ धावांची झुंजार खेळीही भारताचे विश्वविजेतेपद साकारु शकली नाही. अन्या श्रुबसोल हिने ४६ धावांत ६ बळी घेत भारताच्या हातातील विश्वविजेतेपद हिसकावून घेतले. भारताचा डाव ४८.४ षटकात २१९ धावांत संपुष्टात आला