अकोला विमानतळाचा तोटा १0 कोटींचा

By admin | Published: March 11, 2016 03:14 AM2016-03-11T03:14:03+5:302016-03-11T03:14:03+5:30

अकोला येथील विमानतळ पूर्णपणे तोट्यात असून, तेथून विमानांचे उड्डाण होत नाही वा तिथे विमान येतही नाही. तरीही गेल्या चार वर्षांत या विमानतळाला सुमारे १0 कोटी रुपये तोटा झाला आहे

Akola Airport's loss of 10 crores | अकोला विमानतळाचा तोटा १0 कोटींचा

अकोला विमानतळाचा तोटा १0 कोटींचा

Next

नितीन अग्रवाल,   नवी दिल्ली
अकोला येथील विमानतळ पूर्णपणे तोट्यात असून, तेथून विमानांचे उड्डाण होत नाही वा तिथे विमान येतही नाही. तरीही गेल्या चार वर्षांत या विमानतळाला सुमारे १0 कोटी रुपये तोटा झाला आहे. राज्य सरकारच्या मदतीने हे विमानतळ नफ्यात आणण्यासाठी केंद्राचे प्रयत्न सुरू आहेत.
नागरी विमान वाहतूकमंत्री महेश शर्मा यांनी लोकसभेत सांगितले की अकोला विमानतळाकडून कोणतेही उत्पन्न मिळत नाही. एटीआर ४२ पद्धतीच्या विमानांसाठी हे विमानतळ उपयुक्त असले तरी त्याचा वापरच होत नाही.
ते नफ्यात आणण्यासाठी विमानतळाचा विस्तार आणि धावपट्टीची लांबी ३00 मीटर लांबीची करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे एटीआर ७२ पद्धतीच्या विमानांसाठीही या विमानतळाचा वापर करणे शक्य होईल. त्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने महाराष्ट्र सरकारकडे १७४. ६७ एकर जमीन उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.

Web Title: Akola Airport's loss of 10 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.