दोन्ही शिक्षकांना ठोकल्या नागपुरात बेड्या अकोला पोलिसांची कारवाई, आज न्यायालयात करणार हजर

By Admin | Published: April 4, 2015 01:54 AM2015-04-04T01:54:07+5:302015-04-04T01:54:07+5:30

अकोला - बाभूळगाव जहागिर येथील नवोदय विद्यालयातील तब्बल ४९ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणार्‍या दोन्ही शिक्षकांना शुक्रवारी रात्री १२.२० वाजता अटक करण्यात आली. अकोला पोलिसांनी नागपूरमध्ये या शिक्षकांना बेड्या ठोकल्या. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Akola police took the action of both the teachers, who were beaten by the teachers in Nagpur, today they will appear before the court | दोन्ही शिक्षकांना ठोकल्या नागपुरात बेड्या अकोला पोलिसांची कारवाई, आज न्यायालयात करणार हजर

दोन्ही शिक्षकांना ठोकल्या नागपुरात बेड्या अकोला पोलिसांची कारवाई, आज न्यायालयात करणार हजर

googlenewsNext
ोला - बाभूळगाव जहागिर येथील नवोदय विद्यालयातील तब्बल ४९ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणार्‍या दोन्ही शिक्षकांना शुक्रवारी रात्री १२.२० वाजता अटक करण्यात आली. अकोला पोलिसांनी नागपूरमध्ये या शिक्षकांना बेड्या ठोकल्या. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
अकोला येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये कार्यरत असलेले शिक्षक राजन बी. गजभिये आणि शैलेश एस. रामटेके यांनी विद्यालयातील नववी ते बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींचा लैंगिक छळ चालविला होता. या प्रकाराला विरोध करणार्‍या विद्यार्थिनींना प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण मिळणार नाहीत, विद्यालयातून काढून टाकू, अशा धमक्या देण्यात येत होत्या. त्यामुळे या शिक्षकांचा जाच विद्यार्थिनी निमूटपणे सहन करीत होत्या. एका विद्यार्थिनीने तक्रारीचे धाडस केल्यानंतर इतरही ४९ विद्यार्थिनींनी तिच्या पाठीशी राहून पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या सदस्य डॉ. आशा मिरगे आणि नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर. सिंह यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही शिक्षकांविरुद्ध कलम ३५४ अ आणि पॉस्को ॲक्टच्या कलम ७, ८ नुसार गुन्हा दाखल केला होता. तथापि, गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ३१ मार्च रोजी दोन्ही शिक्षक विद्यालयातून फरार झाले होते. त्यामुळे १ एप्रिल रोजी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन्ही शिक्षकांचा शोध सुरू केला होता. शिक्षक दोन दिवस मोकाट असल्याने तसाच त्यांचा सुगावा लागत नसल्याने २ एप्रिल रोजी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी दोन पथके त्यांच्या शोधासाठी नागपूर व गोंदियाकडे रवाना झाली होती. हे दोन्ही शिक्षक नागपूरमध्ये असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना शुक्रवारी रात्री १२.२० वाजताच्या सुमारास नागपूर येथून अटक केली. या दोन्ही शिक्षकांना घेऊन पोलीस शुक्रवारी रात्रीच अकोल्याकडे निघाले असून, शनिवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
---------------------------------
कोट
नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनींच्या लैंगिक छळ प्रकरणातील दोन्ही शिक्षकांना शुक्रवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. या दोन्ही शिक्षकांना नागपूर येथून अटक करण्यात आली असून, शनिवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
डॉ. प्रवीण मुंडे
साहाय्यक पोलीस अधीक्षक
अकोला.

Web Title: Akola police took the action of both the teachers, who were beaten by the teachers in Nagpur, today they will appear before the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.