अक्षरधाम हल्ल्याच्या सूत्रधार अब्दुल राशीद सुलेमान अजमेरी याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 01:04 AM2017-11-05T01:04:34+5:302017-11-05T01:04:44+5:30
गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिरावर २००२ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार अब्दुल राशीद सुलेमान अजमेरी याला येथील विमानतळावर अटक करण्यात आली आहे. सौदी अरेबियाहून तो परतला असता पोलिसांनी त्याला पकडले.
अहमदाबाद : गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिरावर २००२ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार अब्दुल राशीद सुलेमान अजमेरी याला येथील विमानतळावर अटक करण्यात आली आहे. सौदी अरेबियाहून तो परतला असता पोलिसांनी त्याला पकडले.
गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त राजदीपसिंह जाला यांनी सांगितले की, अब्दुल राशीद हा आपल्या आई आणि भावाला भेटण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. शनिवारी पहाटे १.३० वाजता त्याला अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. तो रियाधहून येथे आला होता.
२४ सप्टेंबर २००२ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात ३२ जण ठार, तर ८४ जण जखमी झाले होते. अजमेरी हा या प्रकरणात अटक करण्यात आलेला नववा आरोपी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजमेरी हा गत दोन दशकांपासून सौदी अरेबियात होता. (वृत्तसंस्था)