नक्षलवादी हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना अक्षयकडून मदत
By admin | Published: March 16, 2017 09:02 PM2017-03-16T21:02:21+5:302017-03-16T23:43:02+5:30
बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार नेहमीच त्याच्या कामासाठी, देशभक्ती आणि माणूसकी जपणारा अभिनेता यासाठी ओळखला जातो.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार नेहमीच त्याच्या कामासाठी, देशभक्ती आणि माणूसकी जपणारा अभिनेता यासाठी ओळखला जातो. त्यांने पुन्हा एकदा देशावर असलेले प्रेम दाखवून दिले आहे. नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या कुटुंबियांसाठी एक कोटी आठ लाख रुपयांची मदत करण्याचे अक्षय कुमारने जाहीर केले आहे.
गेल्या 11 मार्चला छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी आणि सीआरपीएफ यांच्यात चकमक झाली होती. या चकमकीत सीआरपीएचे 12 जवान शहीद झाले होते. या शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी नऊ लाख रुपयांची आर्थिक मदत अक्षय कुमारकडून करण्यात येणार आहे आहे.
दरम्यान, अक्षय कुमारने याआधी भारतीय लष्कराच्या जवानांना वेळोवेळी मदत केल्याचे दिसून आले आहे. तसेच, महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अक्षय कुमार पुढे सरसावला होता. त्याने दुष्काळग्रस्तांसाठी लाखो रुपयांची मदत राज्य सरकारकडे सुपूर्द केली होती.
Akshay Kumar donated Rs 1.08 cr, 9 lakh each to families of 12 CRPF men who lost their lives in an attack by Maoists in Sukma, Chhattisgarh. pic.twitter.com/1Xz4pLB6EX
— ANI (@ANI_news) March 16, 2017