अल निनोमुळे पावसाबद्दल यावर्षी काहीशी काळजी

By Admin | Published: March 6, 2017 04:34 AM2017-03-06T04:34:16+5:302017-03-06T04:34:16+5:30

अल निनोच्या रचनेची जी शक्यता दिसते त्यामुळे भारतातील पावसाबद्दल काहीशी काळजी वाटेल

Al Nino has some care about rain this year | अल निनोमुळे पावसाबद्दल यावर्षी काहीशी काळजी

अल निनोमुळे पावसाबद्दल यावर्षी काहीशी काळजी

googlenewsNext


नवी दिल्ली : यावर्षी अल निनोच्या रचनेची जी शक्यता दिसते त्यामुळे भारतातील पावसाबद्दल काहीशी काळजी वाटेल परंतु पाऊस आणि पिकांवरील नेमका परिणाम हा काही फक्त एवढ्या या एकाच घटकावर अवलंबून नाही, असे नोमुराच्या अहवालात म्हटले आहे.
आॅस्ट्रेलियन ब्युरो आॅफ मेटेओरॉलॉजीच्या (एबीएम) माहितीनुसार २०१७ मध्ये अल निनो आकाराला येणे वाढले आहे. एबीएमने पाहणी केलेल्या आठपैकी सहा नमुन्यांनी अल निनोची सुरवात जुलै २०१७ मध्ये होण्याची शक्यता दाखवली आहे. यावर्षी अल निनो परिस्थिती घडण्याची साधारणत: ५० टक्के असेल.
एकूण, २०१७ मध्ये सामान्यापेक्षा खाली पाऊस होण्याची शक्यता ही सामान्य वर्षात सामान्यापेक्षा वर पाऊस होण्याच्या शक्यतेपेक्षा जास्त आहे. तथापि, पाऊस आणि अन्न उत्पादनावरील नेमका परिणाम हा इतर अनेक घटकांवर अवलंबून आहे, असे नोमुरा इंडियाचे मुख्य अर्थतज्ज्ञ सोनल वर्मा आपल्या संशोधन टिपणीत म्हणाले.
अल निनो ही हवामानाची एक अवस्था आहे व तिचा भारताच्या पर्जन्य हंगामावर मोठा परिणााम होतो. सामान्य पाऊस होणे हे देशाच्या शेतीसाठी खूप महत्वाचे आहे कारण देशातील फार मोठी शेतजमीन ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यामुळे भारताच्या मान्सूनबद्दल काहीशी काळजी व्यक्त होत आहे.
देशात जून ते सप्टेंबर असा पावसाळा असतो व अल निनो परिस्थिती ही सामान्यापेक्षा खालच्या पावसाशी संबंधित आहे.
>नकारात्मकही परिणाम
नोमुराने केलेल्या विश्लेषणानुसार देशात अल निनोचा प्रारंभ पावसाळ््यात जेव्हा सरासरीने तोडला गेला तेव्हा भारतात फक्त पाच वेळा (१९८७,१९९१, २००२,२००४, २०१५) सामान्यपेक्षा खालचा पाऊस झाला तर तीन वेळा सामान्य पाऊस झाला.
१९९४ मध्ये सामान्यपेक्षा वर पाऊस झाला. याशिवाय अल निनोच्या कालावधीचाही कृषी क्षेत्रावर परिणाम होत असतो. पेरणी झाल्यावर लगेचच जुलैमध्ये अल निनो आला तर त्याचा अन्नधान्य उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो.
तथापि, अल निनोची परिस्थिती आॅगस्टच्या अखेरीस निर्माण झाली तर त्याचा परिणाम नकारात्मक नसूही शकेल.

Web Title: Al Nino has some care about rain this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.