‘अल-कायदा’ वळवताेय काश्मीरकडे माेर्चा; संयुक्त राष्ट्राचा अहवाल, भारताची चिंता वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 08:05 AM2022-05-31T08:05:06+5:302022-05-31T08:05:20+5:30

संयुक्त राष्ट्राचा तालिबान व इतर संबंधित व्यक्ती आणि संस्थांसंबंधी एक अहवाल सादर करण्यात आला आहे.

Al-Qaeda turns to Kashmir; UN report, raises India's concerns | ‘अल-कायदा’ वळवताेय काश्मीरकडे माेर्चा; संयुक्त राष्ट्राचा अहवाल, भारताची चिंता वाढणार

‘अल-कायदा’ वळवताेय काश्मीरकडे माेर्चा; संयुक्त राष्ट्राचा अहवाल, भारताची चिंता वाढणार

googlenewsNext

नवी दिल्ली : अफगाणिस्तानात गेल्या वर्षी तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर, जगासाठी धाेकादायक ठरलेली दहशतवादी संघटना अल-कायदा पुन्हा सक्रिय झाली आहे. मात्र,  अल-कायदा भारत आणि काश्मीरकडे पुन्हा लक्ष केंद्रित करीत असल्याचे संकेत मिळाले आहेत. भारताच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे.

संयुक्त राष्ट्राचा तालिबान व इतर संबंधित व्यक्ती आणि संस्थांसंबंधी एक अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यातून यासंदर्भात संकेत देण्यात आले आहेत. अल-कायदाची भारतीय उपखंडातील संघटना ‘क्यूआयएस’ने आपल्या ‘नवा-ए-अफगाण जिहाद’ या मासिकाचे नाव बदलून ‘नवा-ए-गजवाह-ए हिंद’ असे ठेवले आहे.

अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर दहशतवाद्यांचा एक हेतू पूर्ण झाला. आता ते भारत आणि काश्मीरकडे लक्ष केंद्रित करत असल्याचे यावरून स्पष्ट हाेत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.  अमेरिकेच्या हल्ल्यानंतर अल-कायदाकडे सध्या एक कमकुवत संघटना म्हणून बघण्यात येत आहे. मात्र, आता संघटनेला बळकटी मिळू लागल्याने भारताची चिंता वाढली आहे.

अमली पदार्थांची तस्करी वाढली
तालिबाननी सत्तेकडे आंतरराष्ट्रीय उत्पन्नाचे स्रोत फार कमी आहेत. मात्र, अफगाणिस्तानातून माेठ्या प्रमाणावर हेराॅईन व इतर अमली पदार्थांच्या तस्करीतून तालिबानला प्रचंड पैसा मिळत आहे. २०२१ च्या उत्तरार्धानंतर तस्करी माेठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये गुजरातमध्ये फार माेठ्या प्रमाणावर हेराॅईनचा साठा जप्त करण्यात आला आहे. हे त्याचेच सूचक आहे.

अफगाणिस्तानातील अस्तित्व जगासाठी चिंताजनक
अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटना २०२३पर्यंत तरी आंतरराष्ट्रीय हल्ले करण्यास सक्षम नाहीत. मात्र, अफगाणिस्तानच्या भूमीत असलेले त्यांचे अस्तित्व जगासाठी चिंतेचा विषय असल्याचे अहवालात म्हटले आहे.

Web Title: Al-Qaeda turns to Kashmir; UN report, raises India's concerns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.