Road Safety: डोळे झाकताच अलार्म, गाडी थांबेल आपोआप, विद्यार्थ्यांनी तयार केले नवीन उपकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 05:45 AM2023-04-21T05:45:36+5:302023-04-21T05:46:23+5:30

Road Safety: देशात दरवर्षी लाखो लोकांचा रस्ते अपघातात बळी जात आहे. असे अपघात टाळण्यासाठी इंदूरच्या विद्यार्थ्यांनी एक अप्रतिम उपकरण बनवले आहे. डोळे झाकले असता तत्काळ अलार्म वाजतो आणि गाडी थांबते.

Alarm as soon as eyes are closed, car will stop automatically, new device created by students | Road Safety: डोळे झाकताच अलार्म, गाडी थांबेल आपोआप, विद्यार्थ्यांनी तयार केले नवीन उपकरण

Road Safety: डोळे झाकताच अलार्म, गाडी थांबेल आपोआप, विद्यार्थ्यांनी तयार केले नवीन उपकरण

googlenewsNext

इंदूर : देशात दरवर्षी लाखो लोकांचा रस्ते अपघातात बळी जात आहे. असे अपघात टाळण्यासाठी इंदूरच्या विद्यार्थ्यांनी एक अप्रतिम उपकरण बनवले आहे. डोळे झाकले असता तत्काळ अलार्म वाजतो आणि गाडी थांबते.

विद्यार्थ्याने सांगितले की, या अलार्ममध्ये झोपविरोधी ग्लासेस आहेत. जर ड्रायव्हर गाडी चालवताना झोपला तर त्याचा बजर वाजतो. जर बजर वाजल्यानंतरही ड्रायव्हरने डोळे उघडले नाहीत तर वाहनाची चाके आपोआप थांबली जातील.

अभिषेक पाटीदार म्हणाला, होशंगाबादमधील बस अपघातानंतर हे उपकरण बनवण्याची प्रेरणा मिळाली. ते बनवण्यासाठी ३ आठवडे लागले आणि ५ जणांनी मिळून ते बनवले.

महाराष्ट्रात चाचणी सुरू
महाराष्ट्रातील नागपूरमध्येही असे  एक उपकरण तयार करण्यात आले आहे, जे ड्रायव्हरला झोप लागल्यावर सावध करेल आणि अपघात होण्यापासून रोखेल. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर परिवहन विभागाकडून वाहनांमध्ये चाचणीसाठी हे उपकरण बसविण्याची तयारी सुरू आहे.

Web Title: Alarm as soon as eyes are closed, car will stop automatically, new device created by students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.