देवळ्यात खिचडीत अळया, सभापतींचा आरोप

By admin | Published: August 3, 2015 10:26 PM2015-08-03T22:26:44+5:302015-08-03T22:26:44+5:30

कुपोषित बालकांची वाढली संख्या

Alas, the chairmanship of the chairmanship | देवळ्यात खिचडीत अळया, सभापतींचा आरोप

देवळ्यात खिचडीत अळया, सभापतींचा आरोप

Next
पोषित बालकांची वाढली संख्या
नाशिक : महिला व बालकल्याण विभाग या ना त्या कारणाने वादाच्या भोवर्‍यात सापडलेला असतानाच आता देवळा तालुक्यातील इंदिरानगर अंगणवाडीत पोषण आहारात अळया आढळून आल्याची माहिती कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी दिली. इतकेच नव्हे तर लोहोणेरच्या अंगणवाडीत कुपोषित बालकांची संख्या सातवरून ४७ इतकी झाल्याचा आरोपही केला आहे.
देवळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या इंदिरानगर येथील अंगणवाडीत दुपारच्या पोषण आहारातील खिचडीत अळया आढळल्याची तक्रार सभापती केदा अहेर यांच्याकडे दुपारीच करण्यात आली. तशी छायाचित्रेही सभापती केदा अहेर यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव खंदारे यांना दाखविण्याचा प्रयत्न केला. तसेच देवळा हा बिगर आदिवासी तालुका असतानाही तालुक्यातील सॅम व मॅम (कुपोषित) बालकांच्या संख्येत घट होण्याऐवजी वाढच का होत आहे, याचाही जाब विचारला. लोहोणेर येथील अंगणवाडीत कुपोषित बालकांची संख्या सात असताना ती अचानक वाढून ४७ कशी झाली, महिला व बालकल्याण विभाग मग कुपोषण कमी करण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करतो, कोट्यवधीचा निधी कोठे खर्च होतो, याची माहिती कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव खंदारे यांना विचारली. तसेच कुपोषण कमी करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत, तसेच खिचडीत अळया निघाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.(प्रतिनिधी)
इन्फो..
वादाची किनार
चांदवड व देवळा तालुक्यातील अंगणवाडी सेविका भरतीवरील स्थगिती उठविण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. या निर्णयाचे श्रेय घेण्यावरूनही भाजपा व शिवसेनेच्या सभापतीत चांगलीच जुंपली आहे. भाजपाचे आमदार डॉ. राहुल अहेर व आपण स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून ही स्थगितीवरील बंदी उठविण्यासाठी चर्चा केली. त्यानुसारच मुख्यमंत्र्यांनी भरतीवरील स्थगिती उठविण्याचा निर्णय घेतला. मात्र महिला व बालकल्याण सभापती शोभा डोखळे यांनी काही दिवसांपूर्वीच प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या भरतीवरील स्थगिती आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाने उठविली आहे. त्यामुळे भाजपा सभापती केदा अहेर प्रचंड संतप्त झाले असून, त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव खंदारे यांची सोमवारी चांगलीच खरडप˜ी काढली.

Web Title: Alas, the chairmanship of the chairmanship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.