गोलाणी मार्केटमध्ये मद्यपींचा धुडगूस
By Admin | Published: January 24, 2017 10:03 PM2017-01-24T22:03:27+5:302017-01-24T22:03:27+5:30
जळगाव : गोलाणी मार्केटमध्ये गेल्या तीन महिन्यापासून मद्यपींचा प्रचंड उपद्रव वाढला असून कोणाचा धाक नसल्याने दिवसेंदिवस त्यांची हिंमत वाढत चालली आहे. मार्केटच्या गच्चीवर रात्रंदिवस पत्यांचा जुगार व पार्ट्या केल्या जात आहेत. यात रहिवशांच्या पाण्याच्या टाक्या व त्यावरील झाकणे फोडण्यात ्रआली आहेत. टोळकेच्या टोळके फिरत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
ज गाव : गोलाणी मार्केटमध्ये गेल्या तीन महिन्यापासून मद्यपींचा प्रचंड उपद्रव वाढला असून कोणाचा धाक नसल्याने दिवसेंदिवस त्यांची हिंमत वाढत चालली आहे. मार्केटच्या गच्चीवर रात्रंदिवस पत्यांचा जुगार व पार्ट्या केल्या जात आहेत. यात रहिवशांच्या पाण्याच्या टाक्या व त्यावरील झाकणे फोडण्यात ्रआली आहेत. टोळकेच्या टोळके फिरत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.गोलाणी मार्केटच्या तिसर्या मजल्यावर रहिवाशी भाग आहे तर काही ठिकाणी दुसर्या व चौथ्या मजल्यावर नागरिक वास्तव्याला आहेत. या परिसरात पुर्वी रात्री मद्यपींचा धुमाकूळ असायचा आता दिवसाही सुरु झाला आहे. बाहेरुन जेवण व दारुच्या बाटल्या आणून गच्चीवर पाण्याच्या टाकीच्या सावलीचा आसरा घेवून हे टोळके तेथे पार्ट्या करतात. टाकीमधून पाण्याचा वापर करतात तर काही वेळा झाकण उघडले नाही तर ते दगडाने फोडून टाकतात. हा प्रकार अस झाल्याने अनेक जणांनी त्यांना हटकले, मात्र त्यांच्यावरच दादागिरी केली जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.बियरच्या बाटल्यांचा खचगच्चीवर देशी,विदेशी व बियरच्या बाटल्यांचा मोठा साठा तयार झाला आहे. आपसातील भांडणामुळे बाटल्या फोडल्या जातात. रात्री तर जोरजोराने आरडाओरड व अश्लिल शिवीगाळ केली जातेे. काही जण तर मुली व महिलांना सोबत आणून कोपर्यात अश्लिल चाळे करतात, या प्रकारामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. पोलिसांकडे तक्रार करुनही त्याचा फारसा उपयोग होत नाही.गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांचाच समावेशमार्केटमध्ये मोकळ्या जागेत तसेच गच्चीवर पार्ट्या करुन धिंगाणा घालणार्या या तरुणांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाचीच आहे. चोर्या चपाट्या करुन आलेल्या पैशाची येथे उधळपी केली जाते. यातील काही तरुण पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. रेल्वे स्टेशन, गोलाणी मार्केट, बी.जे.मार्केट ही त्यांची ठिकाण असल्याचे रहिवाशांनी सांगितले. पोलिसांनी या परिसरात रात्रंदिवस गस्त करावी अशी मागणी केली जात आहे.