अलर्ट ! फक्त 10 महिन्यांत 76 वाघांचा मृत्यू

By admin | Published: November 7, 2016 10:01 AM2016-11-07T10:01:37+5:302016-11-07T10:01:37+5:30

जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान एकूण 76 वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी देशभरातील असून मध्यप्रदेश यादीत सर्वात पहिल्या स्थानावर आहे

Alert! In just 10 months, 76 tigers die | अलर्ट ! फक्त 10 महिन्यांत 76 वाघांचा मृत्यू

अलर्ट ! फक्त 10 महिन्यांत 76 वाघांचा मृत्यू

Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 7 - जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान एकूण 76 वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी देशभरातील असून मध्यप्रदेश यादीत सर्वात पहिल्या स्थानावर आहे. वाघांच्या संख्येत आघाडीवर असलेल्या कर्नाटकचा या यादीत दुसरा क्रमांक आहे. 2010 पासूनची आकडेवारी पाहता वाघांचा मृत्यूचा हा आकडा आतापर्यंता उच्चांक आहे. 2015 मध्ये 69 वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली होती. संवर्धनकर्त्यांनी वाघांची शिकार वाढली असून अनेक भागांमध्ये मृतदेह सापडले असल्याचं सांगत अलर्ट जारी केला आहे. 
 
टायगरनेट (Tigernet) कडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि ट्राफिक-इंडियाने संयुक्तरित्या ही आकडेवारी दिली आहे. 76 पैकी 41 वाघांच्या मृत्यूचं कारण समजू शकलेलं नसून तपास सुरु आहे. तर इतर वाघांच्या मृत्यूमागे शिकार, विषप्रयोग, रस्ते अपघात, वीजेचा शॉक लागून आणि एकमेकांवर केलेला हल्ला कारणीभूत ठरले आहे.
 
'ऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान शिकार केल्याच्या जास्त घटना समोर येतात, मात्र यावेळी ट्रेंड वेगळाच दिसत असल्याचं,' ट्राफिक इंडियाचे मुख्य शेखर कुमार निरज यांनी सांगितलं आहे. यावर्षी परिस्थिती गंभीर असून वाघांच्या मृत्यूत 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 

Web Title: Alert! In just 10 months, 76 tigers die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.