अलर्ट ! भारतात झिका व्हायरसची घुसखोरी, आढळले तीन पेशंट

By Admin | Published: May 27, 2017 08:25 PM2017-05-27T20:25:46+5:302017-05-27T21:52:49+5:30

गतवर्षी ब्राझील आणि दक्षिण अमेरिकेत हाहाकार माचवणा-या झिका व्हायरसने भारतातही घुसखोरी केली आहे

Alert! Zinc virus infiltration in India, found three patients | अलर्ट ! भारतात झिका व्हायरसची घुसखोरी, आढळले तीन पेशंट

अलर्ट ! भारतात झिका व्हायरसची घुसखोरी, आढळले तीन पेशंट

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 27 - गतवर्षी ब्राझील आणि दक्षिण अमेरिकेत हाहाकार माचवणा-या झिका व्हायरसने भारतातही घुसखोरी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने गुजरातमधील तीन जणांना झिका व्हायरसची लागण झाल्याच्या बातमीला दुजारो दिला आहे. भारतात झिका व्हायरसची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. तिन्ही पेशंट अहमदाबादच्या बापूनगरचे रहिवासी आहेत.
 
जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या वेबसाईटवर छापलेल्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, अहमदाबादच्या बी जे मेडिकल कॉलेजमध्ये 10 ते 16 फेब्रुवारीदरम्यान एकूण 93 रक्ताचे नमुने जमा करण्यात आले होते. यामधील एका 64 वर्षीय व्यक्तीला झिका व्हायरसची लागण झाल्याचं आढळलं. भारतात झिका व्हायरसची लागण होण्याचं हे पहिलंच प्रकरण आहे.
 
अशाच प्रकारे एका 34 वर्षीय महिलेच्या रक्तचाचणीत झिका व्हायरस झाल्याचं समोर आलं आहे. महिलेने गतवर्षीच मुलाला जन्म दिला आहे. त्यावेळी घेण्यात आलेल्या तिच्या रक्ताच्या नमुन्यात झिका व्हायरसचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. 
 
जागतिक आरोग्य संघटनेने झिका व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. मच्छरांना रोखण्यासाठी उपाय केल्यास तसंच नियंत्रण ठेवल्यास व्हायरस रोखला जाऊ शकतो असं त्यांनी सांगितलं आहे. गरोदर महिलांना विशेष काळजी घेण्यास सांगण्यात आलं आहे. लोकांनी संपुर्ण शरिर झाकणारे तसंच हलक्या रंगाचे कपडे घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
 
‘झिका’ व्हायरस कसा पसरतोय ?
एडिस जातीच्या डासाने पसरणारा हा एक व्हेक्टर बॉर्न डिसीज आहे. या जातीच्या डासाच्या दंशामुळे डेंग्यू आणि चिकनगुनियादेखील पसरतो.
 
गर्भवती स्त्रीकडून बाळाला धोका – 
गर्भारपणाच्या काळात आईकडून नवजात बाळाला ‘झिका’ व्हायरसचा संसर्ग होतो. यामध्ये व्हायरस बाळाच्या अविकसित  मेंदूवर थेट हल्ला करतो. अशा प्रकारामुळे जन्माला येणार्‍या बाळाचे डोके शरीराच्या तुलनेत छोटे असते. या आजाराला ‘मायक्रोसेफली’ म्हणतात. ब्राझीलमध्ये ऑक्टोबर 2015 पासून सुमारे या आजाराचे 4000 बालक जन्माला आलेले आहेत.
 
लक्षणं 
झिका व्हायरसमुळे फ्लू ची लक्षण आढळून येतात. यामध्ये सौम्य ताप, डोकेदुखी, डोळे लाल होणे, अंगावर रॅशेज येणे अशी प्राथमिक लक्षणं दिसतात. डासाच्या दंशानंतर किमान 2-7 दिवसांमध्ये दिसून येतात.
 
धोका कोणाला ? 
रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या हृद्यविकार, मधूमेह  आणि यकृताचे विकार असलेल्या रुग्णांना इंफेक्शनचा धोका अधिक असतो. सोबतच वयोवृद्ध लोक, गर्भवती स्त्रिया व लहान मुलांना ‘झिका’ व्हायरसचा संसर्ग अधिक होऊ शकतो. यामुळे नवजात बालमृत्यूचे  प्रमाण अधिक नसले तरीही यामुळे जन्मजात दोष निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे पॅरॅलिसिस, लिव्हर फेल्युयरचा धोका असतो.
 
खबरदारीचा उपाय -
भारतात अजूनही ‘झिका’ व्हायरसचे रुग्ण आढळले नाहीत. मात्र परदेशातून भारतात येणार्‍या पर्यटकांची, संशयित रुग्णांची पुरेशी चाचणी देशभरात केली जात आहे. तसेच  या व्हायरसचा धोका डासांमुळे पसरत असल्याने तुमच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. डबकी  किंवा घरात फार दिवस पाणी भरलेले राहणार नाही याची काळजी घ्या. 
 

Web Title: Alert! Zinc virus infiltration in India, found three patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.