अलिगढ मुस्लिम विद्यापीठातही विद्यार्थ्यांना सक्तीचा "रमजान"

By admin | Published: May 31, 2017 06:26 PM2017-05-31T18:26:27+5:302017-05-31T20:01:47+5:30

रमजानचा महिना सुरू असल्याने गलिगढ युनिव्हर्सिटीतील हॉस्टेलच्या मेसमध्ये सुर्योदयापासून ते सुर्यास्तापर्यंत विद्यार्थ्यांना जेवण दिलं जात नाही आहे.

Aligarh Muslim University also mandates "Ramadan" for students | अलिगढ मुस्लिम विद्यापीठातही विद्यार्थ्यांना सक्तीचा "रमजान"

अलिगढ मुस्लिम विद्यापीठातही विद्यार्थ्यांना सक्तीचा "रमजान"

Next
ऑनलाइन लोकमत
अलिगढ, दि. 21- सोशल मीडियावर कोणत्याही घटनेचे तीव्र पडसाद उमटत असतात. आज सकाळपासून अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी ट्विटरवर चर्चेचा विषय बनवली आहे. सध्या रमजानचा महिना सुरू आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने उपवास करून रमजान साजरा करतो आहे. पण अलिगढ युनिव्हर्सिटीमध्ये मुस्लिम मुलं उपवास करत आहेत पण तिथे जे हिंदू विद्यार्थी आहेत त्यांच्यावरसुद्धा उपवास करायची वेळ आली आहे.  रमजानचा महिना सुरू असल्याने अलिगढ युनिव्हर्सिटीतील हॉस्टेलच्या मेसमध्ये सुर्योदयापासून ते सुर्यास्तापर्यंत विद्यार्थ्यांना जेवण दिलं जात नाही आहे.  प्रशांत पटेल  या व्यक्तीने ट्विटकरून युनिव्हर्सिटीमध्ये सुरू असलेल्या प्रकारा संदर्भात माहिती दिली आहे.
 
 
 प्रशांत पटेल यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली. युनिव्हर्सिटी प्रशासन एका विशिष्ट धर्मासाठी हॉस्टेलच्या मेसमधील नियमांमध्ये का बदल करते आहे, असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जातो आहे. यामध्ये धर्मनिरपेक्षता नाही का, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. 
अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या अधिकृत वेबसाइटवर युनिव्हर्सिटीच्या नव्या नियमाबद्दलची माहिती देण्यात आली आहे. युनिव्हर्सिटीच्या व्हाइस चान्सलर यांच्या मंजूरीनंतर शैक्षणिक आणि अ-शैक्षणिक विभागाच्या कार्यालयीन वेळेत रमजानच्या दरम्यान बदल करण्यात आला आहे तसंच कुठल्याही बैठकित किंवा कॅम्पसमधील कार्यक्रमात नाश्ता-पाणी पुरवलं जाणार नाही, रमजानचं पावित्र्य जपण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे. 
"रमजान साजरा करणं गेल्या 50 वर्षांपासून सुरू आहे. पण जे विद्यार्थी उपवास करत नाहीत त्यांनी मेस बंद असताना काय करावं? पण आम्ही आमच्या जेवणाचं नियोजन करतो आहे, अशी माहिती अलिगढ युनिव्हर्सिटी विद्यार्थी संघाचा उपाध्यक्ष नमीद अन्सारी यानं दिली आहे.  विद्यार्थी संघाने याआधी डीनकडे यासंदर्भातील लेखी तक्रार केली होती, असंही नमीद अन्सारी म्हणाले आहेत. रमजानमध्ये मेस बंद ठेवणं या मुद्द्यावर सोशल मीडियावर खूप टीका होते आहे, विद्यार्थी संघासाठी ही गोष्ट नवीन आहे, असं अन्सारी यांनी सांगितलं आहे. 
अलिगढ युनिव्हर्सिटीमध्ये इतर धर्मिय विद्यार्थीसुद्धा आहेत. हॉस्टेलच्या मेसमधील नवीन नियमांमुळे इतर विद्यार्थ्यांनासुद्धा उपवास पाळावा लागतो आहे. युनिव्हर्सिटीमध्ये एकुण 16 हॉस्टेल मेस आहेत. या मेस विविध हॉलमध्ये चालविल्या जातात. रमजानच्या काळात मध्यरात्री अडीच वाजता तेथे जेवण दिलं जातं. युनिव्हर्सिटीमध्ये सध्या सुरू असलेल्या परिस्थितीबद्दल एका विद्यार्थ्याने माहिती दिली आहे. "मला आज मध्यरात्री अडीच वाजता खायला मिळालं. दुसरा संपूर्ण दिवस मॅगी आणि लिंबू पाणी प्यावं लागलं. आता हिच परिस्थिती इफ्तारच्या वेळी येइल. मला बळजबरीने उपवास करावा लागतो आहे, असं युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्याने सांगितलं आहे. 
जे विद्यार्थी उपवास करत नाहीत त्यांनी बळजबरीने उपवास करावा लागतो आहे. मेसमध्ये जेवळ मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना बाहेर जेवायला जावं लागतं पण आजूबाजूचा परिसर मुस्लिम असल्याने तिथेसुद्धा काही मिळत नाही. कॉलेजपासून चार किलोमीटर अंतरावर एक ढाबा आहे पण प्रत्येकाकडे स्वतःची गाडी नसल्याने तिथे जाणं शक्य होत नाही. शेवटी उपाशी रहावं लागतं असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. 
विद्यार्थ्यांच्या या तक्रारीवर प्रोफेसर जमशेद सिद्धीकी यांनी उत्तर दिलं आहे. "रमजानच्या महिन्यात हॉस्टेल मेसमधून नाश्ता आणि दुपारचं जेवण न देण्याचा नियम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे, तसंच या काळात कॅम्पसमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात पदार्थ दिले जात नाहीत,असं ते म्हणाले आहेत". 
 

 

Web Title: Aligarh Muslim University also mandates "Ramadan" for students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.