आॅलिव्ह रिडले कासवांनीच नष्ट केली आपली अंडी
By admin | Published: March 7, 2017 04:10 AM2017-03-07T04:10:11+5:302017-03-07T04:10:11+5:30
सहा लाख एवढ्या विक्रमी संख्येतील आॅलिव्ह रिडले कासवांनी गहीरमाथा समुद्र किनाऱ्यावरील वाळुत यावर्षी अंडी घातली.
गहीरमाथा (ओडिशा) : सहा लाख एवढ्या विक्रमी संख्येतील आॅलिव्ह रिडले कासवांनी गहीरमाथा समुद्र किनाऱ्यावरील वाळुत यावर्षी अंडी घातली. परंतु जागेच्या प्रचंड टंचाईमुळे कित्येक दशलक्ष अंडी कासवांनीच नष्ट केल्यामुळे वन्यजीवप्रेमी खूपच निराश झाले आहेत.
२२ फेब्रुवारी रोजी हा सामुहिक अंडी घालण्याचा महिना सुरू झाला. त्याला अर्रीबादा (कासवांच्या जातींनी मोठ्या प्रमाणात अंडी घालण्यास स्पॅनिश भाषेत अर्रीबादा म्हणतात). या किनाऱ्यावर मनुष्यवस्ती नाही. दोन मार्चच्या रात्रीपर्यंत या ठिकाणी ६ लाख ४ हजार ६४१ आॅलिव्ह रिडले कासवांनी अंडी घातली होती, असे वन्यजीव अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. या जातीच्या कासवांनी सात कोटींपेक्षा जास्त अंडी घातली. तथापि, तीन कोटींपेक्षा जास्त अंड्यांची हानी झाली, असा अंदाज असल्याचे हा अधिकारी म्हणाला. एक किलोमीटर लांबीच्या या किनाऱ्यावर कासवांना अंडी घालण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे परंतु ते अंडी घालण्यासाठी विशिष्ट जागेचीच निवड करतात. त्याचा परिणाम किनाऱ्यावर जागेची टंचाई निर्माण झाली, असे गहीरमाथा वन विभागाचे अधिकारी सुब्रत पात्रा म्हणाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात कासवांनी अंडी घातल्यामुळे वन्यजीव आनंदले होते.
ही अंडी नेहमी नष्ट करणारे तरस किंवा कोल्ह्यांचे कृत्य नाही नाही तर स्वत: कासवांनीच ती मोठ्या प्रमाणावर नष्ट केली आहेत. अंडी घालण्यासाठी योग्य जागेची निवड करताना आधीच घातलेली दश लक्षावधी अंडी कासवांनी नष्ट केली आहेत व ही नासधूस थांबवता येणार नसल्याचे पात्रा म्हणाले.