एएन-३२ विमान दुर्घटनेत सर्व तेरा जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 07:31 AM2019-06-14T07:31:56+5:302019-06-14T07:32:23+5:30
अवशेष आढळले : दुर्घटनास्थळी सापडला ब्लॅक बॉक्स
नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशात दुर्घटनाग्रस्त झालेल्या एएन-३२ या विमानाच्या अवशेषाची बचाव पथकाने तपासणी केल्यानंतर भारतीय वायुदलाने या विमानातील सर्व १३ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत घोषणा केली. दुर्घटनास्थळी ब्लॅक बॉक्स सापडला असून, शुक्रवारी मृतदेह शोधण्यात येणार आहे.
दुर्दैवाने या विमान दुर्घटनेतून कोणीही बचावले नाही. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या वायुदलाच्या शूरवीरांना वायुदलाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या दुर्घटनेत विंग कमांडर जी. एम. चार्ल्स, स्क्वॉड्रन लिडर एच. विनोद, फ्लाईट लेफ्टनंट एल. आर. थापा, एम. के. गर्ग, आशिष तन्वर आणि सुमित मोहंती, वॉरंट आॅफिसर के. के. मिश्रा, सार्जंट अनुप कुमार, कॉरपोरल शेरीन, एस. के. सिंह, पंकज आणि राजेश आणि पुतली या शूरवीरांचा मृत्यू झाला. वायुदलाच्या या शूरवीरांना काँग्रेसने श्रद्धांजली अर्पण केली. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी टष्ट्वीट करून म्हटले आहे की, वायुदलाचे हे १३ शूरवीर सुरक्षित राहोत, अशी प्रार्थना गेले दहा दिवस भारतीय करीत होते. शोक व्यक्त करताना त्यांनी बहादूर जवानांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. पराक्रमी योगदानासाठी देश या जवानांचा कायम ऋणी असेल, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी टिष्ट्वटरवरून श्रद्धांजली अर्पण केली.
तीन जून रोजी झाले होते बेपत्ता
च्रशियन बनावटीचे एएन-३२ हे विमान ३ जून रोजी आसाममधील जोºहाट येथून चीनच्या सीमेलगत अरुणाचल प्रदेशातील मेंचूककडे रवाना झाले होते.
च्उड्डाणानंतर ३३ मिनिटांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. बेपत्ता विमान शोधण्यासाठी वायुदलाने व्यापक मोहीम हाती घेतली होती.
च्या विमानाचे अवशेष मंगळवारी लिपोच्या उत्तरेला १२ हजार फूट उंचीवर आढळले होते. दुर्घटनास्थळी बुधवारी १५ सदस्यांचे पथक रवाना करण्यात आले
होते.
च् या पथकातील ८ जण गुरुवारी सकाळी दुर्घटनास्थळी पोहोचले, असे वायुदलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.