राज्यातील सर्व ६ उमेदवार राज्यसभेवर, बिनविरोध निवड; सोनिया गांधी, जे.पी. नड्डा, अश्विनी वैष्णव विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 09:07 AM2024-02-21T09:07:58+5:302024-02-21T09:08:24+5:30
मंगळवारी ही घोषणा झाली.
नवी दिल्ली : राज्यसभेवर राज्यातील सहाही उमेदवारांसह राजस्थानमधून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, गुजरातमधून भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, मध्य प्रदेशमधून केंद्रीय मंत्री एल. मुरुगन, ओडिशातून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह ४१ उमेदवार बिनविरोध निवडून आले. मंगळवारी ही घोषणा झाली.
जाहीर निकालांमध्ये भाजपचे सर्वाधिक २०, त्यानंतर काँग्रेसचे ६, तृणमूल काँग्रेसचे ४, वायएसआर काँग्रेसचे तीन, राजदचे २, बिजदचे २, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, जनता दल (यू)चा प्रत्येकी एक उमेदवार आला.
हेही आले बिनविरोध
देवाशिष सामंतरे, सुभाशिष खुंटिया, चुनीलाल गारासिया, मदन राठोड, जसवंतसिंह, मयांक नायक, गोविंदभाई ढोलकिया, सुभाष बराला, सुश्मिता देव, सागरिका घोष, ममता ठाकूर, मोहम्मद नदीमूल हक, सामिक भट्टाचार्य, जी. बाबू राव, वाय. व्ही. सुब्बा रेड्डी, एम. रघुनाथ रेड्डी, रेणुका चौधरी, अनिलकुमार यादव व्ही. रविचंद्र, देवेंद्रप्रताप सिंह..
हे महाराष्ट्रातून...
महाराष्ट्रातून बिनविरोध निवडून आलेल्या सहा जणांमध्ये अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे (भाजप), मिलिंद देवरा (शिवसेना), प्रफुल्ल पटेल (राष्ट्र्रवादी काँग्रेस पक्ष), चंद्रकांत हंडोरे (काँग्रेस) यांचा समावेश आहे.
२७ रोजी निवडणूक
५६ पैकी ४१ उमेदवार बिनविरोध निवडून आले. उत्तर प्रदेशातील १०, कर्नाटकमधील ४, हिमाचल प्रदेशमधील १ या जागांसाठी २७ रोजी आता मतदान होईल.