विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 07:40 PM2024-05-27T19:40:33+5:302024-05-27T19:41:14+5:30
Swati Maliwar beating case: आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांना झालेल्या कथिक मारहाण प्रकरणी अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार यांना मोठा धक्का बसला आहे. या मारहाण प्रकरणी दिल्लीतील तीस हजारी कोर्टाने विभव कुमार यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांना झालेल्या कथिक मारहाण प्रकरणी अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार यांना मोठा धक्का बसला आहे. या मारहाण प्रकरणी दिल्लीतील तीस हजारी कोर्टाने विभव कुमार यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायमूर्तींनी विभव कुमार यांची रवानगी तिहार तुरुंगात केली होती. त्यानंतर विभाव कुमार यांनी न्यायालयासाठी कोर्टात धाव घेतली होती.
दरम्यान, विभव कुमार यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना स्वाती मालिवाल यांच्याकडून सांगण्यात आले की, ज्या सुविधा कुणालाही मिळत नाही त्या विभव यांना मिळताना दिसत आहेत. आधी आपचा स्वयंसेवक असलेल्या एका मोठ्या युट्युबरने एक व्हिडीओ तयार केला आहे. त्यानंतर मला धमक्या देण्यात येऊ लागल्या. त्यात बलात्काराच्या धमक्याही दिल्या गेल्या. माझ्यावर भाजपाच्या एजंट असल्याचा आरोप वारंवार करण्यात आला. यांच्याकडे ट्रोल आर्मी आहे. सगळी यंत्रणा माझ्याविरोधात कामाला लावण्यात आली. सातत्याने पत्रकार परिषदा घेण्यात आल्या. विभव हे सामान्य व्यक्ती नाहीत. जर ते तुरुंगातून बाहेर आले माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे.
दिल्ली पोलिसांच्या सरकारी वकिलांनीही जामीन अर्जाला विरोध करताना सांगितले की, भारतामध्ये महिला लैंगिक शोषणाविरोधात तक्रार करण्यास संकोच करतात. आम्ही विभवला मुंबईत नेले होते. तिथे त्यांनी फोन फॉर्मेट करण्यात आला होता. त्यावर न्यायमूर्तींनी तुम्हाला त्यांचा फोन का हवा आहे, असा सवाल विचारला. त्यावर दिल्ली पोलिसांनी सांगितले की, विभवने कुणाला फोन केले. मुख्यमंत्र्यांना फोन करून परवानगी घेतली गेली होती का? विभव यांनी फोन दिल, पण त्याचा पासवर्ड सांगितला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, स्वाती मालिवाल यांनी केलेल्या आरोपानुसार १३ मे रोजी जेव्हा त्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा घराच्या लॉबीमध्ये त्यांचे पीए विभव कुमार यांनी त्यांना बेदम मारहाण केली, त्यानंतर स्वाती मालिवाल यांनी त्वरित पीसीआर कॉल करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातही धाव घेतली होती.