रद्द झालेले सारे चलन दोन महिन्यांत पुन्हा येणार
By admin | Published: February 1, 2017 02:02 AM2017-02-01T02:02:30+5:302017-02-01T02:02:30+5:30
रद्द करण्यात आलेले सारे चलन येत्या महिना-दोन महिन्यांत संपूर्ण पुन्हा उपलब्ध होईल, असे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी सांगितले. सर्व चलन
नवी दिल्ली : रद्द करण्यात आलेले सारे चलन येत्या महिना-दोन महिन्यांत संपूर्ण पुन्हा उपलब्ध होईल, असे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी सांगितले. सर्व चलन बाजारात आल्यानंतर आर्थिक वृद्धीला चालना मिळेल, असेही ते म्हणाले.
अर्थसंकल्पपूर्व आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर केल्यानंतर सुब्रमण्यम यांनी पत्रकारांशी बातचीत केली. त्यांनी सांगितले की, नोटाबंदी हा चलन इतिहासातील एकमेवाद्वितीय प्रयोग होता. पाच वर्षांनंतर या विषयावर ५0 ते १00 पीएचडी प्रबंध लिहिले जातील. नोव्हेंबरमध्ये अपेक्षेपेक्षा कमी नोटा टंचाई दिसून आली. असंघटित क्षेत्रावर नोटाबंदीचा अल्पकालिन परिणाम झाला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
- डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणे सुरूच राहायला हवे. मात्र, त्याचवेळी आपणास सावध राहायला हवे, असे मला वाटते. व्यवहार टप्प्याटप्प्याने व्हायला हवेत.
- हे काम नियंत्रणाच्या मार्गाने करण्याऐवजी प्रोत्साहन लाभाच्या मार्गाने व्हावे, असे मला वाटते.