एसबीआयने पेटीएमसह सर्व ई वॉ़लेट केले ब्लॉक

By admin | Published: January 4, 2017 03:38 PM2017-01-04T15:38:54+5:302017-01-04T15:38:54+5:30

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने या ई वॉलेट्सना जबदस्त दणका देताना सर्व ई वॉलेट्स

All e-wallet blocks with SBI's Pettym | एसबीआयने पेटीएमसह सर्व ई वॉ़लेट केले ब्लॉक

एसबीआयने पेटीएमसह सर्व ई वॉ़लेट केले ब्लॉक

Next
>ऑनलाइन लोकमत 
नवी दिली, दि. 4 - नोटाबंदीचा निर्णय आणि सरकारने कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केल्यापासून पेटीएमसह अनेक ई वॉलेटना 'अच्छे दिन' आले आहेत.  मात्र सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने या ई वॉलेट्सना जबदस्त दणका देताना सर्व ई वॉलेट्स ब्लॉक केले आहेत.
स्टेट बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे एसबीआयच्या नेट बँकींगमधून पेटीएम, मोबी क्विक एअरटेल मनीसह अन्य  ई वॉलेट्समध्ये पैसे पाठवता येणार नाहीत. मात्र क्रेडिट कार्डमधून या ई वॉलेट्समध्ये पैसे जमा करता येतील.  दरम्यान, ई वॉलेट्स ब्लॉक करण्याच्या निर्णयाबाबत रिझर्व्ह बँकेने खुलासा मागवला असता संरक्षण आणि व्यावसायिक हित जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे एसबीआयने सांगितले. याबाबतचे वृत्त सीएनबीसीने दिले आहे. 
ग्राहकांच्या खात्यांच्या सुरक्षेचा विचार करून पेटीएमला ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेटीएमचा वापर करताना काही ग्राहक फसवणुकीचे शिकार झाले होते. दरम्यान, पेटीएमला ब्लॉक करण्याचा निर्णय तात्पुरत्या स्वरूपाचा असून सुरक्षेची पडताळणी केल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात येईल, असे एसबीआयकडून सांगण्यात आले आहे. 

Web Title: All e-wallet blocks with SBI's Pettym

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.