भारतभूमीवर पोहोचण्याआधीच राफेलचे शक्तीप्रदर्शन; हवेतल्या हवेतच भरले इंधन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 05:13 AM2020-07-29T05:13:18+5:302020-07-29T05:13:33+5:30
आज दिमाखात भारतात पोहोचणार : ३0 हजार फूट उंचीवर इंधन भरले
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : हवाईदलाच्या मारकक्षमतेस बळकटी देण्यासाठी खरेदी केलेल्या पाच राफेल लढाऊ विमानांनी फ्रान्सहून भारताकडे येताना वाटेत हवेत ३० हजार फूट उंचीवरून उडत असतानाच पुढील प्रवासासाठी इंधन भरून घेतले. ही विमाने संयुक्त अरब अमिरातींमध्ये थोडा वेळ थांबून उद्या बुधवारी अंबाला येथील हवाईतलावर पोहोचतील.
हवेत सुसाट वेगाने भरारी मारत असतानाच इंधन भरून घेणे हे या शक्तिसाली विमानांचे अनेकांपैकी एक गुणवैशिष्टय आहे. म्हणूनट इंधनासाठी खाली उतरावे न लागता दीर्घकाळ सलग उड्डाण करून दूरवर हल्ला करू शकण्याची क्षमता हे या विमानांचे महत्वाचे बलस्थान आहे. ते त्यांनी स्वदेशी येतानाच्या पहिल्याच प्रवासात यशस्वीपणे दाखवून दिले. साहजिकच हवाईदलाने उड्डाणातच इंधन भरून घेणाऱ्या या विमानांची मनोहारी छायाचित्रे टष्ट्वीटरवर प्रसिद्ध केली.
च्या राफेल विमानांना हवेतच इंधन भरून घेता यावे यासाठी फ्रान्सच्या हवाईदलाने त्यांची दोन ‘ए ३३० फेनिक्स एमआरटीटी’ ही इंधनवाहक विमाने त्यांच्यासोबत पाठविली आहेत.
च्या फ्रेंच विमानांनी राफेल विमानांसोबत उडत असतानाच इंधनाचा पाईप त्यासाठी तयार केलेल्या खास नळाला अजूकपणे जोडून इंधन भरले. ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल भारताने फ्रान्सचे आभार मानले.
च्या दोन इंधन भरणाºया विमानांपैकी एका विमानातून फ्रान्स सरकारने भारताच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यास मैत्री व सदिच्छेच्या भावनेने मदत ही पाठविली आहे.