सीएए आंदोलनांंमुळे प्रजासत्ताकदिनापूर्वी हैदराबादमध्ये राष्ट्रध्वजांचा तुटवडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 01:43 PM2020-01-09T13:43:18+5:302020-01-09T13:58:31+5:30
हैदराबादमध्ये 4 जानेवारीला झालेल्या आंदोलनात हजारो लोकं रस्त्यावर उतरल्यामुळे राष्ट्रध्वजाचा साठा कमी झाला.
हैदराबाद : तेलंगानाची राजधानी हैदराबादमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून सुरू असलेल्या आंदोलनात समर्थक आणि विरोधक दोघेही तिरंगा फडकावत आहेत. यामुळे 26 जानेवारीपूर्वी राष्ट्रध्वजांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर प्रजासत्ताक दिनी प्रथमच ध्वजांची कमतरता निर्माण झाली असल्याचे तिरंगा पुरवठा करणारे व्यापारी सांगतायत.
देशभरात नागरिकत्व काद्याद्यावरून आंदोलने केली जात आहे. तेलंगानाची राजधानी हैदराबादमध्ये सुद्धा नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या मुद्यावरून गेल्या काही दिवसांपासून वेगवगेळ्या संघटनांकडून आंदोलन व रॅली काढण्यात येत आहे. तर या काद्याद्याच्या समर्थनात आणि विरोधात केली जाणाऱ्या दोन्ही आंदोलनामध्ये तिरंगा फडकताना पाहायला मिळत आहे.
हैदराबादमध्ये 4 जानेवारीला झालेल्या आंदोलनात हजारो लोकं रस्त्यावर उतरल्यामुळे राष्ट्रध्वजाचा साठा कमी झाला. ह्या रॅलीसाठी किरकोळ विक्रेत्यांनी सुमारे साडेतीन लाख राष्ट्रध्वज विकल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता तिरंगा विकणार्या दुकानदारांकडून दुपटीने मागणी होत असल्याची माहिती उत्पादकांनी दिली आहे.
त्यात 10 जानेवारी रोजी एमआयएम पक्षाकडून मोठी रॅली काढण्यात येत असल्याने त्यासाठी सुद्धा मोठ्याप्रमाणावर राष्ट्रध्वजाची मागणी होणार असल्याचा अंदाज विक्रेत्यांनी वर्तवला आहे. त्यातच 26 जानेवारीला सुद्धा तिरंगा ध्वजाची मागणी मोठ्याप्रमाणावर केली जाते. त्यामुळे हैदराबादमध्ये सद्या राष्ट्रध्वजांचा तुटवडा निर्माण झाला असून, भाव सुद्धा दुपट्टीने वाढली आहेत.