जम्मू काश्मीर: सरकारी कार्यालयांवर १५ दिवसांत तिरंगा फडकवा; राज्यपालांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 01:23 PM2021-03-29T13:23:01+5:302021-03-29T13:25:01+5:30

jammu and kashmir: जम्मू आणि काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीर आता केंद्रशासित करण्यात आला.

all govt offices of jammu and kashmir ordered to hoisting national flag within 15 days | जम्मू काश्मीर: सरकारी कार्यालयांवर १५ दिवसांत तिरंगा फडकवा; राज्यपालांचे आदेश

जम्मू काश्मीर: सरकारी कार्यालयांवर १५ दिवसांत तिरंगा फडकवा; राज्यपालांचे आदेश

Next
ठळक मुद्देजम्मू काश्मीरमधील सर्व सरकारी कार्यालयात तिरंगा फडकवण्याचे निर्देशस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमनायब राज्यपालांनी बैठक घेऊन दिले निर्देश, सूचना

जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीर आता केंद्रशासित करण्यात आला. त्यानंतर आता नायब राज्यपालांकडून जम्मू आणि काश्मीरच्या सर्व सरकारी कार्यालयात तिरंगा ध्वज फडकवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यासाठी मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी जम्मू-काश्मीरसाठी स्वतंत्र ध्वज स्वीकारण्यात आला होता. (all govt offices of jammu and kashmir ordered to hoisting national flag within 15 days)

जम्मू आणि काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० असताना तेथे लाल रंगाचा स्वतंत्र ध्वज स्वीकारण्यात आला होता. मात्र, दोन वर्षांपूर्वी जम्मू आणि काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवून त्याचे विभाजन करण्यात आले. त्यानंतर आता तेथील नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी काही निर्देश दिले आहेत. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नायब राज्यपालांनी काही सूचना केल्याची माहिती मिळाली आहे. 

CoronaVirus: कोरोनाचा कहर कायम; दुसरी लाट अधिक आक्रमक, ३०० टक्के तीव्र

सर्व सरकारी कार्यालयावर तिरंगा

विभागीय आयुक्तांनी यासंदर्भात माहिती दिली. नायब राज्यपाल सिन्हा यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्यासोबत एक बैठक घेतली. या बैठकीनंतर जम्मू काश्मीरमधील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये आगामी १५ दिवसांत भारताचा तिरंगा ध्वज फडकवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जम्मू काश्मीरच्या प्रत्येक जिल्ह्यातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोलाचे योगदान दिलेल्या व्यक्तींची ओळख पटवून त्याचा तपशील सादर करण्याच्या सूचना नायब राज्यपालांकडून देण्यात आल्या आहेत. या सर्वांना अमृत महोत्सवाच्या विशेष सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे. 

दरम्यान, ११ जुलै १९५२ रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये एक विधेयक मंजूर करून स्वतंत्र ध्वजाला मान्यता देण्यात आली होती. यामुळे भारताचा आणि जम्मू-काश्मीरचा ध्वज स्वतंत्र झाला होता. भारतीय घटनेच्या अनुच्छेत १४४ नुसार जम्मू-काश्मीरच्या स्वतंत्र ध्वजाला पुढे मान्यात देण्यात आली होती. मात्र, दोन वर्षांपूर्वी अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर आता एक देश, एक ध्वज अंतर्गत जम्मू आणि काश्मीरमध्ये भारताचा तिरंगा फडकवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Web Title: all govt offices of jammu and kashmir ordered to hoisting national flag within 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.