'ते' दहशतवादी RSS चे कार्यकर्ते; दिग्विजय सिंहांचा गंभीर आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 07:15 PM2018-06-18T19:15:51+5:302018-06-18T19:22:16+5:30
मी कायम संघाचा दहशतवाद हाच शब्द वापरला आहे.
भोपाळ: देशात आजपर्यंत जितके हिंदू धर्माचे अतिरेकी पकडण्यात आले आहेत, ते सर्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते (RSS) असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला. ते सोमवारी मध्य प्रदेशातील जाभुआ येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी दिग्विजय सिंह यांनी म्हटले की, महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देखील संघाचाच भाग होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधाराच तिरस्कार आणि तेढ पसरवणारी आहे, ज्यामुळे RSS चे कार्यकर्ते दहशतवादाकडे वळतात, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले.
तसेच मी हिंदू दहशतवादी हा शब्दप्रयोग कधीही केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी कायम संघाचा दहशतवाद हाच शब्द वापरला आहे. दहशतवाद कोणत्याही धर्माशी जोडला जाऊ शकत नाही. कोणतीही दहशतवाद पसरवणारी घटना धर्माच्या आधारावर ठरवली जाऊ शकत नाही, कारण असा कोणताच धर्म नाही जो दहशतवादाचे समर्थन करतो. ज्या अतिरेक्यांनी मालेगाव, मक्का मशिद, समझौता एक्स्प्रेसमध्ये बॉम्बस्फोट घडवले ते संघाच्या विचारांनी प्रेरित झालेले होते, असा आरोपही दिग्विजय सिंह यांनी केला.
Jitne bhi Hindu dharm wale aatankwadi pakde gaye hain sab Sangh ke karyakarta rahe hain. Nathu Ram Godse, the man who killed Mahatma Gandhi, was also part of RSS. This ideology spreads hate, hate leads to violence, which leads to terrorism: Digvijay Singh,Cong in Jhabua,MP (17.6) pic.twitter.com/9QKHJ1TVmS
— ANI (@ANI) June 18, 2018