सर्व शहिदांचा सन्मान व्हावा; IPS अधिकाऱ्यांच्या संघटनेची प्रज्ञा सिंहना चपराक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 05:16 PM2019-04-19T17:16:52+5:302019-04-19T17:17:54+5:30

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या विधानाने राजकीय वातावरण तापू लागले असताना आता साध्वी यांच्या विधानाचा आयपीएस असोसिएशने ट्विट करत निषेध केलेला आहे.

All martyrs should be respected; IPS officer organization condemned on Sadhi Pradnya singh statement | सर्व शहिदांचा सन्मान व्हावा; IPS अधिकाऱ्यांच्या संघटनेची प्रज्ञा सिंहना चपराक

सर्व शहिदांचा सन्मान व्हावा; IPS अधिकाऱ्यांच्या संघटनेची प्रज्ञा सिंहना चपराक

Next

नवी दिल्ली - साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या विधानाने राजकीय वातावरण तापू लागले असताना आता साध्वी यांच्या विधानाचा आयपीएस असोसिएशने ट्विट करत निषेध केलेला आहे.  भोपाळ लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून निवडणूक लढवत असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंहच्या विरोधात सर्व स्तरातून निषेध केला जातोय. 

आयपीएस असोसिएशने ट्विट करत सांगितले आहे की, अशोक चक्र पुरस्कार विजेते हेमंत करकरे यांनी दहशतवाद्यांविरुद्ध लढा देताना सर्वोच्च बलिदान दिले. भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा यांनी हेमंत करकरेंबद्दल केलेल्या अपमानास्पद विधानाचा आम्ही निषेध करतो. सर्व शहिदांच्या बलिदानाचा आदर केला पाहिजे असं सांगत साध्वी यांच्या विधानावर भाष्य केलं आहे. 


निवडणुकीच्या काळात लष्कर आणि शहीद जवानांबद्दल कोणतीही टिप्पणी करु नये, असे निवडणूक आयोगानं  सांगितलं आहे. हेमंत करकरे हे प्रामाणिक आणि कटीबद्ध अधिकारी होते. मुंबई दशतवादी हल्ल्यात लोकांना वाचवताना ते शहीद झाले अशी भोपाळ काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी दिली आहे. 

तर शहीद हेमंत करकरे यांना मारल्यामुळे प्रज्ञा सिंह साध्वीचं सुतक संपलं...?' याचा अर्थ करकरे यांना मारणारे मास्टर माईंड व साध्वीचे बोलवते धनी आरएसएस रुपी कोण आहेत. हे भारतासमोर आज आलेला आहे. करकरे यांचा अपमान करणाऱ्या देशद्रोहींची 'जीभ' छाटली पाहिजे अशी तीव्र प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडने दिली आहे.  

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर काय म्हणाल्या, वाचा त्यांच्याच भाषेत.....
"वो जांच अधिकारी सुरक्षा आयोग का सदस्य था, उन्होंने हेमंत करकरे को बुलाया और कहा कि साध्वी को छोड़ दो. लेकिन हेमंत करकरे ने कहा कि मैं कुछ भी करूंगा लेकिन सबूत लाउंगा और साध्वी को नहीं छोड़ूंगा."
"ये उसकी कुटिलता था ये देशद्रोह था धर्मविरुद्ध था, वो मुझसे पूछता था कि क्या मुझे सच के लिए भगवान के पास जाना होगा, तो मैंने कहा था कि आपको जरूरत है तो जाइए."
"मैंने उसे कहा था तेरा सर्वनाश होगा, उसने मुझे गालियां दी थीं. जिसदिन मैं गई तो उसके यहां सूतक लगा था और जब उसे आतंकियों ने मारा तो सूतक खत्म हुआ."

'तुझा सर्वनाश होईल म्हटलं अन् २१ दिवसांनी सूतक संपलं'; प्रज्ञा सिंहांचं करकरेंबाबत धक्कादायक विधान

"हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीनं अडकवलं, त्यांना सांगितलं होतं की, तुमचा सर्वनाश होईल, त्यांचा स्वत:च्या कर्मानेच मृत्यू झाला," असं धक्कादायक विधान साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलं आहे. त्यामुळे विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. तसेच साध्वी यांच्या विधानाची निवडणूक आयोगाकडूनही दखल घेण्यात आली आहे. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर साध्वी यांनी केलेल्या विधानामुळे भाजपा चांगलीच गोत्यात आली आहे. 
 

Web Title: All martyrs should be respected; IPS officer organization condemned on Sadhi Pradnya singh statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.