देशभरातील दिवाळीच्या धुमधडाक्याला दु:खाचे गालबोट

By admin | Published: November 13, 2015 12:22 AM2015-11-13T00:22:03+5:302015-11-13T00:22:03+5:30

बुधवारी देशभरात दिवाळीचा धुमधडाका सुरू असताना काही ठिकाणी आग आणि फटाखे फोडतानांच्या दुर्घटनांचे गालबोट लागले.

All the misery of Diwali across the country | देशभरातील दिवाळीच्या धुमधडाक्याला दु:खाचे गालबोट

देशभरातील दिवाळीच्या धुमधडाक्याला दु:खाचे गालबोट

Next

नवी दिल्ली : बुधवारी देशभरात दिवाळीचा धुमधडाका सुरू असताना काही ठिकाणी आग आणि फटाखे फोडतानांच्या दुर्घटनांचे गालबोट लागले. हैदराबादमध्ये फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा होऊन ५० पेक्षा जास्त लोकांना रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल व्हावे लागले. दिवाळीचा आनंदोत्सव सुरू असताना बिहारच्या दोन जिल्ह्यांमध्ये झालेल्या संघर्षात तीन जण मृत्युमुखी पडले. दिल्लीत आगीसंबंधी २९० तर राजस्थानमध्ये ४० पेक्षा जास्त घटनांची नोंद झाली.
दिल्लीत अग्निशामक दलाला सुमारे २९० फोन कॉल आले. त्यातील १२८ घटनांची नोंद मध्यरात्रीनंतर करण्यात आली. संध्याकाळी ६ ते ९ या काळात फटाके फोडण्याला वेग येत असताना आगीच्या अधिकाधिक घटनांमुळे अग्निशामक दलाची दमछाक झाली.
दिल्लीतील ५६ अग्निशामक केंद्रांवर तसेच गर्दीच्या आणि बाजारपेठेच्या २० ठिकाणी अग्निशामक बंबांची खास व्यवस्था करण्यात आली होती. अग्निशामक दलातील ३ हजार जवानांपैकी १८०० जवान सेवेत दाखल होते. किमान १७५ ते १८० वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.
जखमींमध्ये मुलांची संख्या अधिक
हैदराबादमध्ये फटाके फोडताना सावधगिरी न बाळण्याचा परिणाम ५० पेक्षा जास्त लोकांच्या डोळ्यांना दुखापत होण्यात झाला. त्यात मुलांची संख्या सर्वाधिक आहे.
हैदराबादच्या एलव्ही प्रसाद संस्थेत तसेच सरोजिनी देवी नेत्री रुग्णालयात दाखल होणाऱ्यांमध्ये मुलांची संख्या ३० टक्के असल्याचे सूत्रांनी सांगितले. रॉकेट फोडताना दिशा बदलल्यामुळे अनेकांच्या डोळ्यांना फटका बसला. राजस्थानमध्ये फटाक्यांमुळे शंभरावर लोक जखमी झाले. आगीच्या ४० पेक्षा जास्त घटना घडल्या. जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात सुमारे २५० जणांवर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये सर्व वयोगटातील लोकांचा समावेश असल्याचे या रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
बिहारच्या नालंदा आणि नवादा जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी क्षुल्लक कारणांवरून झालेल्या संघर्षात तीन जणांना जीव गमावावा लागला. नालंदा जिल्ह्यातील राजगीर पोलीसठाण्यांतर्गत सिलाबबाजार भागात जुगार खेळणाऱ्या दोन गटांमध्ये झालेल्या भांडणावरून झालेल्या गोळीबारात दोघे ठार झाले. नवादा जिल्ह्यात जुगार खेळत असल्याची पोलिसांना माहिती देण्यात आल्यावरून झालेल्या संघर्षात एक ठार तर अन्य एक जण जखमी झाला.

Web Title: All the misery of Diwali across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.