सर्वधर्म समभाव! 33 वर्षीय मुस्लिम तरुण बनला लिंगायत मठाचा पुजारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 01:16 PM2020-02-20T13:16:19+5:302020-02-20T13:18:27+5:30
कमी वयामध्ये बसवन्ना यांनी १२ व्या शतकात समाज सुधारणावादी विचार मांडले होते. याच विचारांनी मुस्लिम तरुण दीवान शरीफ रहमानसाब मुल्ला हा प्रभावित झाला होता.
गदग : उत्तर कर्नाटकातील गदग जिल्ह्यामध्ये असलेल्या एका लिंगायत समाजाच्या मठाने जुन्या परंपरांना, धर्माच्या भेदभावाला बाजुला ठेवले आहे. 12 व्या शतकातील थोर समाजसेवक बसवन्ना यांच्या विचाराला अनुसरून येथील मठाचा पुजारी म्हणून एका मुस्लिम तरुणाची निवड केली आहे. मठाधीशांच्या निर्णयाचे समाजातूनही स्वागत होत आहे.
कमी वयामध्ये बसवन्ना यांनी १२ व्या शतकात समाज सुधारणावादी विचार मांडले होते. याच विचारांनी मुस्लिम तरुण दीवान शरीफ रहमानसाब मुल्ला हा प्रभावित झाला होता. महत्वाचे म्हणजे या मठासाठी मुल्लाच्या कुटुंबीयांनी काही वर्षांपूर्वी दोन एकर जागाही दान केली होती.
शरीफ याचे वय 33 वर्षे असून त्याला मुरुगराजेंद्र कोरानेश्वर शांतिधाम मठाचा पुजारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हा मठ खजुरी गावातील कोरानेश्वर संस्थान मठाशी संलग्न आहे. हा मुख्य मठ 350 वर्षे जुना आहे. याबाबत मठाचे स्वामी मुरुगराजेंद्र कोरानेश्वर यांनी सांगितले की, आम्ही अनुयायांसोबत धर्माचा भेदभाव न करता सर्वांना सामावून घेतो. तुम्ही कोणत्या जातीचे आहात याचा काही फरक पडत नाही. जर देवाने तुम्हाला सद्भावना आणि त्यागाच्या मार्गासाठी निवडले असेल तर त्याचा जन्म आणि जातीच्या जोखडांचा विचार केला जाणार नाही.
तर या निवडीवर प्रतिक्रिया देताना शरीफ म्हणाले की, मला असे करण्यास कोणी सांगितले नाही. पण माझ्या अंतरात्म्याने ठरविले आणि मला मार्गदर्शन केले.
Dewan Sharief Mullah: They've put the sacred thread & given me the responsibility. They've given me the 'Ishta-linga' & this honour. I've done the 'Ishta-linga dharan'. I'll walk on the path of dharma. Love & sacrifice is the message given to me, that is what I want to propagate. https://t.co/En3mmHv8k3pic.twitter.com/moyZHOe5us
— ANI (@ANI) February 20, 2020
लहानपणापासूनच बसवान्नांच्या विचारांचे आकर्षण
शरीफ याला काल दिक्षा देण्यात आली. बसवान्नांच्या विचाराची मला लहानपणापासूनच आवड होती. यामुळे मी जवळच्याच गावामध्ये पीठाची चक्की चालवत होतो. तसेच उरलेल्या वेळामध्ये मी बसवन्ना आणि अन्य साधुंचे विचार आत्मसात करत होतो. तसेच त्याची प्रवचनेही करत होतो. स्वामीजींनी माझ्या या छोट्याशा सेवेला मान दिला आणि सोबत घेतले. मी माझे गुरु आणि बसवन्ना यांनी सांगितलेल्या रस्त्यावर चालणार आहे.