बॅँक व्यवहारांवरील सर्व बंधने झाली शिथिल

By admin | Published: March 14, 2017 07:40 AM2017-03-14T07:40:55+5:302017-03-14T07:40:55+5:30

केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीनंतर बँकेतून तसेच एटीएममधून पैसे काढण्यावर घालण्यात आलेली सर्व बंधने रिझर्व्ह बँकेने सोमवारपासून मागे घेतली. त्यामुळे देशातील अर्थव्यवहार आता पुन्हा

All the restrictions on bank transactions were loosened | बॅँक व्यवहारांवरील सर्व बंधने झाली शिथिल

बॅँक व्यवहारांवरील सर्व बंधने झाली शिथिल

Next

मुंबई : केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीनंतर बँकेतून तसेच एटीएममधून पैसे काढण्यावर घालण्यात आलेली सर्व बंधने रिझर्व्ह बँकेने सोमवारपासून मागे घेतली. त्यामुळे देशातील अर्थव्यवहार आता पुन्हा
८ नोव्हेंबरच्या पूर्वीप्रमाणे सुरळीत होणार आहेत. ही होळीची भेट आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांनी सांगितले की, बचत खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादा सध्या असलेली कायम राहील. २८ फेब्रुवारीपासून बचत खात्यातून खातेदारांना ५० हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याआधी बचत खात्यातून एक सप्ताहात २४ हजार रुपये काढता येत होते. देशातील चलनाचा पुरवठा सुरळीत झाल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने याआधीच चालू खाती तसेच कॅश क्रेडिट खात्यांमधून रक्कम काढण्याच्या मर्यादेमध्ये वाढ केली आहे. याआधी १ फेब्रुवारीपासून रिझर्व्ह बँकेने एटीएममधून पैसे काढण्यावरील निर्बंध शिथिल केले होते. (प्रतिनिधी)


८ नोव्हेंबर - चलनातील ५०० आणि १०००
रुपये मूल्यांच्या नोटा रद्द केल्याची घोषणा. नागरिकांना बँकांमधून ४००० रुपयांपर्यंत नोटा बदलून घेण्याची मुभा, एटीएममधून प्रत्येक
कार्डावर २००० रुपये काढणे शक्य
बँकांमधून नोटा बदलून मिळण्याची मर्यादा वाढवून ४५०० रुपये, एटीएममधून दररोज २५०० रुपये काढण्याला परवानगी. बचत खात्यामधून २०,००० रु. काढण्यास परवानगी
बचत खात्यामधून सप्ताहाला २४,००० तर चालू खात्यामधून ५०,००० रुपये काढण्याची मुभा.


बचत खात्यावर मात्र
काही काळ मर्यादा
बँकांमधील बचत खात्यामधून आता एका सप्ताहात ५० हजार रुपये काढता येतात.
ही मर्यादा आणखी काही काळ चालू राहणार असल्याचे रिझर्व्ह बँकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. आगामी काळात याबाबत योग्य ते निर्णय घेण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले आहे. एटीएममधून खातेदारांना दिवसाला १० हजार रुपये काढण्याची मर्यादाही वाढलेली आहे.

Web Title: All the restrictions on bank transactions were loosened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.