सर्व उपग्रह मार्चपर्यंत कक्षेत स्थिरावणार
By admin | Published: October 9, 2015 12:39 AM2015-10-09T00:39:11+5:302015-10-09T00:39:11+5:30
क्षेत्रीय दिशादर्शक उपग्रह यंत्रणेतील (आयआरएनएसएस) सर्व सातही उपग्रह मार्च २०१६ पर्यंत कक्षेत स्थिरावण्याची अपेक्षा असल्याचे ‘इस्रो’ या भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने गुरुवारी स्पष्ट केले.
बंगळुरू : क्षेत्रीय दिशादर्शक उपग्रह यंत्रणेतील (आयआरएनएसएस) सर्व सातही उपग्रह मार्च २०१६ पर्यंत कक्षेत स्थिरावण्याची अपेक्षा असल्याचे ‘इस्रो’ या भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने गुरुवारी स्पष्ट केले.
केवळ भारतासभोवतालच्या सर्व देशांना नव्हे, तर संपूर्ण जगाला सिग्नल यंत्रणा पुरविण्याचा त्यामागे उद्देश असल्याचे इस्रोचे अध्या ‘गगन’ यंत्रणा असलेले दोन उपग्रह कार्यरत असून चार दिशादर्शक उपग्रह अंतराळातून डाटा पुरवत आहेत.
जीसॅट-१५ हा गगन पेलोड लावलेल्या नव्या उपग्रहाचे १० नोव्हेंबर रोजी प्रक्षेपण होणार आहे. सर्व सातही उपग्रह मार्च २०१६ पर्यंत कक्षेत स्थिरावण्याची अपेक्षा आहे. यामुळे देश अंतराळ क्षेत्रात स्वावलंबी होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. इस्रोच्या उपग्रह केंद्रात जागतिक दिशादर्शक उपग्रह यंत्रणा वापरकर्त्यांच्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. (वृत्तसंस्था)
जगभरात व्याप्ती वाढविणार
उपग्रह कक्षेत स्थिरावल्यानंतर आम्ही अन्य देशांसोबत कार्य करीत यंत्रणेची व्याप्ती जगभरात वाढविणार आहोत. सध्या ही यंत्रणा १५०० कि.मी. पलीकडे सिग्नल पोहोचविण्याचे काम करीत आहे. आणखी काही भूभाग जोडत संपूर्ण जग व्यापणे शक्य होणार आहे. सध्या कोरिया आणि आखाती देशांसोबत चर्चा केली जात आहे. हळहळू विस्तार वाढविला जाईल. त्यासाठी दशकापेक्षाही कमी काळ लागेल.
भारतीय उपखंडातील वस्तूंची स्थिती, वेग आणि वेळेसह सर्व माहिती पुरविण्यासह स्वतंत्र उपग्रह दिशादर्शक यंत्रणा पुरविण्यासाठी इस्रोने पुढाकार घेतला आहे. सात उपग्रहांच्या एकत्रित यंत्रणेमुळे जमिनीवर मोठे नेटवर्क उपलब्ध करवून देता येईल,असे कुमार यांनी नमूद केले.