तर सर्व गाळेधारक आज रस्त्यावर उतरतील... पत्रपरिषदेत व्यापार्यांचा इशारा: हॉकर्स स्थलांतराला विरोध कायम
By admin | Published: April 4, 2016 12:39 AM2016-04-04T00:39:12+5:302016-04-04T00:39:12+5:30
जळगाव : न्यू बी.जे. मार्केटच्या आवारात पार्कीर्ंगच्या जागेवर चारही बाजूने हॉकर्स बसविण्यास गाळेधारकांचा विरोध असून मनपा प्रशासनाने ही बाब लादली तर सोमवारी सर्व गाळेधारक रस्त्यावर उतरतील, असा इशारा न्यू बी.जे. मार्केटमधील व्यापार्यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत देण्यात आला.
Next
ज गाव : न्यू बी.जे. मार्केटच्या आवारात पार्कीर्ंगच्या जागेवर चारही बाजूने हॉकर्स बसविण्यास गाळेधारकांचा विरोध असून मनपा प्रशासनाने ही बाब लादली तर सोमवारी सर्व गाळेधारक रस्त्यावर उतरतील, असा इशारा न्यू बी.जे. मार्केटमधील व्यापार्यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत देण्यात आला. माजी नगरसेवक किशोर भोसले, निशिकांत बामणोदकर, अतुल वाणी, संजय नेवाडकर, किशोर पाटील आदी उपस्थित होते.यावेळी भोसले यांनी सांगितले की, संत अप्पा महाराज समाधी मंदिराच्या बाजूने मार्केटची मोठी जागा असल्याने त्या बाजूला दोन-तीन रांगांमध्ये हॉकर्स बसविण्यास आमची सहमती आहे. मात्र मार्केटच्या चारही बाजूने २५० हॉकर्सला जागा देण्याचा घाट मनपा प्रशासनाने घातला आहे. इन्फो-तर आम्हाला मार्केट सोडावे लागेलमार्केटमध्ये ९४० दुकाने व ६४ फ्लॅट आहेत. त्यांच्याकडील वाहने, दुकानात येणार्या ग्राहकांची वाहने यांच्या पार्कीर्ंगसाठी जागाच उरणार नाही. तसेच सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे आमच्यावरच मार्केट सोडून जाण्याची वेळ येईल, असा इशारा भोसले यांनी दिला.इन्फो- प्रशासनाकडून दिशाभूलएकाच बाजूला हॉकर्सला जागा देण्याचे मान्य केलेले असताना प्रशासनाने दिशाभूल करीत चारही बाजूने हॉकर्सला जागा देण्याचा घाट घातला आहे. मार्केट मनपाचे असले तरी आमच्या हक्कावर ते गदा आणू शकत नाहीत. बॅरीकेटस् बसविण्याचे मान्य केले होते. मात्र त्याची पूर्तता केलेली नाही. प्रशासनाचे नियोजनच नसल्याने घोळ झाला असून त्यामुळेच घोंगडे झटकण्याचा प्रयत्न प्रशासन करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.------ इन्फो-----रहिवाशांची सुरक्षा धोक्यातमार्केटमधील व्यापारी व मार्केटमध्येच वर रहिवासाला असलेले निशिकांत बामणोदकर हे रविवारी सकाळी त्यांचे नातलग आल्याने खाली उतरले असता तीन-चार जणांनी येऊन हॉकर्सला विरोध का करतो? असे सांगत साखळीने मारहाण केली. बाकीच्या व्यापार्यांनी धाव घेतल्यावर हल्लेखोर पसार झाले. हॉकर्स येण्यापूर्वीच व्यापार्यांना मारहाणीचे प्रकार सुरू झाले आहेत. मनपाच्या मार्केटच्या आवारात २५० च्या आसपास हॉकर्स आणून बसविले तर मार्केटमधील रहिवाशांची विशेषत: महिलावर्गाची सुरक्षितता धोक्यात येणार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.