कोणतेही बटण दाबल्यास सर्व मते भाजपकडे?; Video व्हायरल होताच एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 10:52 AM2023-02-20T10:52:00+5:302023-02-20T10:52:43+5:30

मेघालयात ईव्हीएमचा व्हिडीओ व्हायरल

All votes to BJP if any button is pressed?; As soon as the video went viral, one was arrested | कोणतेही बटण दाबल्यास सर्व मते भाजपकडे?; Video व्हायरल होताच एकाला अटक

कोणतेही बटण दाबल्यास सर्व मते भाजपकडे?; Video व्हायरल होताच एकाला अटक

Next

शिलाँग : मेघालयमध्ये ईव्हीएमबाबत खोटी माहिती दिल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. १६ फेब्रुवारी रोजी आर. संगमा नावाच्या व्यक्तीने ईव्हीएमचा एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यात दावा केला होता की, कोणतेही बटण दाबल्यास सर्व मते भाजपकडे जात आहेत.

रोंगजेंग विधानसभा मतदारसंघाचे पीठासीन अधिकाऱ्यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची चौकशी केली असता ईव्हीएमशी संबंधित दावा खोटा असल्याचे आढळून आले. यानंतर भादंविम १७१ जी अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. निवडणुकीशी संबंधित खोटी माहिती पसरवल्याचा आरोप आरोपींवर करण्यात आला आहे. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारीला मतदान झाले, तर मेघालय आणि नागालँडमध्ये २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या राज्यांचे निकाल २ मार्च रोजी जाहीर होतील. या निवडणुकांचे एक मनोरंजक वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही राज्यांमध्ये बहुमताचा आकडा ३१ आहे.

Web Title: All votes to BJP if any button is pressed?; As soon as the video went viral, one was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.