संदीप घोष यांच्या फोनमधून सगळे उघड होणार; सीबीआय या प्रकरणाचा आणखी तपास करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 04:30 PM2024-08-28T16:30:09+5:302024-08-28T16:31:14+5:30
कोलकाता येथील आरजी कर रुग्णालयातील महिला डॉक्टर हत्या प्रकरणी सीबीआयने तपास सुरू केला आहे. या प्रकरणी माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या मोबाईलची चौकशी सुरू आहे.
कोलकाता येथील आरजी कर रुग्णालयात एका महिला डॉक्टरची अत्याचार करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणी सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. सीबीआयने आता माजी प्राचार्य संदीप घोष यांची चौकशी सुरू केली आहे. याआधी सीबीआयने आरोपीची कसून चौकशी केली.
'निराश अन् भयभीत झाले...', कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा संताप
प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह ९ ऑगस्ट रोजी सकाळी सेमिनार रूममध्ये आढळल्यानंतर लगेचच झालेल्या मोबाईल फोन कॉल्सचा सीबीआय ट्रॅक करत आहे. घोष यांनी केलेले फोन कॉल्स ट्रॅक करून तपास अधिकारी त्या कॉल्सवरील संभाषणांमध्ये नेमके काय झाले याची चौकशी सुरू आहे.
माजी प्राचार्य संदीप घोष यांनी हत्या झाली त्यादिवशी कोणा कोणाला फोनवरुन संपर्क साधला याची चौकशी करत आहेत. प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या हत्येबाबत कोणाला काही माहिती दिली होती किंवा कोणाला सूचना दिल्या होत्या. याचाही तपास करणार आहेत.
सीबीआय अधिकाऱ्यांनी यापूर्वीच घोष यांची पॉलीग्राफ चाचणी केली आहे. केंद्रीय तपास संस्थेने कोलकाता पोलिस सहाय्यक उपनिरीक्षक अनुप हलदर आणि या प्रकरणातील एकमेव आरोपी संजय रॉयचा जवळचा सहकारी यांच्यावर हीच चाचणी घेण्यासाठी कोलकाता ट्रायल कोर्टाकडे परवानगी मागितली आहे.
सीबीआय अधिकाऱ्यांनी यापूर्वीच घोष यांची पॉलीग्राफ चाचणी केली आहे. केंद्रीय तपास संस्थेने कोलकाता पोलिस सहाय्यक उपनिरीक्षक अनुप हलदर आणि या प्रकरणातील एकमेव आरोपी संजय रॉयचा जवळचा सहकारी यांच्यावर हीच चाचणी घेण्यासाठी कोलकाता ट्रायल कोर्टाकडे परवानगी मागितली आहे.
रुग्णालयातील तिच्या वरिष्ठ डॉक्टरांच्या, विशेषत: जे घोष यांचे विश्वासू होते, त्यांचे आणि तिचे पटत नव्हते. यामुळेच या हत्येमागे काही दडलेल्या सत्यांबद्दल सीबीआयला संशय येतो. या हत्येमागे अनेकांनी संशय व्यक्त केला आहे.सीबीआय आर.जी. करमधील आर्थिक अनियमिततेचीही समांतर चौकशी सुरू आहे. आता सीबीआयच्या दोन तपास पथके समांतर तपास करत आहेत आणि दोन्ही प्रकरणांमध्ये काही संबंध आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.