सिडनीत योगगुरू स्वामी आनंद गिरींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 12:16 PM2019-05-07T12:16:21+5:302019-05-07T12:16:28+5:30
प्रयागराजच्या निरंजनी आखाड्याशी संबंधित योगगुरू स्वामी आनंद गिरी यांना ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात अटक करण्यात आली आहे.
लखनऊः प्रयागराजच्या निरंजनी आखाड्याशी संबंधित योगगुरू स्वामी आनंद गिरी यांना ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर महिलांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांना 26 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. 38 वर्षीय योगगुरू स्वामी आनंद गिरी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचे शिष्य आहेत. देश-विदेशात ते योग शिकवतात. महंत नरेंद्र गिरी यांनीही आनंद गिरी यांना अटक झाल्याची माहिती दिली आहे.
2016च्या एका प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. साधू-संत पीठ थोपटून भक्तांना आशीर्वाद देतात. एका विदेशी महिलेलाही तशाच प्रकारचा आशीर्वाद दिला. परंतु पाठ थोपटून दिलेल्या आशीर्वादाच्या आडून मारहाण केल्याचा आरोप त्या महिलेनं केला आहे. मारहाणीसारखा कोणताही प्रकार झाला नव्हता. आनंद गिरी यांनी काल दुपारी 12.35 वाजता अटक करण्यात आली आहे. सध्या आनंद गिरी यांना 26 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे.
आनंद गिरींवर हे आहेत आरोप
योगगुरू आनंद गिरी यांच्या दोन वेगवेगळ्या प्रकारात महिलांवर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. प्रार्थनेसाठी त्या महिलांना आनंद गिरींनी आमंत्रण दिलं होतं. 2016ला त्यांनी आपल्या घरात कथित स्वरूपात 29 वर्षीय महिलेबरोबर मारहाण केली. त्यानंतर 2018मध्येही गिरींनी 34 वर्षीय महिलेबरोबर कथित स्वरूपात मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर आनंद गिरींवर हे प्रसिद्ध योगगुरू आहेत. त्यांनी योगाभ्यास शिकवण्यासाठी हाँगकाँग, लंडन, द. आफ्रिका, पॅरिस आणि मेलबर्नसह 30 देशांचा प्रवास केला आहे. केंब्रिज, ऑक्सफोर्ड आणि सिडनीतल्या प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीतही त्यांनी लेक्चर दिले आहेत.