अलाहाबादचं नाव यापुर्वीही 'प्रयागराज'चं होतं, 444 वर्षांपूर्वी अकबर बादशहानं बदललं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 04:00 PM2018-10-16T16:00:56+5:302018-10-16T16:03:07+5:30

योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाने अलाहाबाद शहराचे नाव प्रयागराज करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या शहराला पहिलेच नाव मिळाले आहे.

Allahabad's name was already 'Prayagraj', 444 years ago Akbar Badshahan changed | अलाहाबादचं नाव यापुर्वीही 'प्रयागराज'चं होतं, 444 वर्षांपूर्वी अकबर बादशहानं बदललं

अलाहाबादचं नाव यापुर्वीही 'प्रयागराज'चं होतं, 444 वर्षांपूर्वी अकबर बादशहानं बदललं

Next

अलाहाबाद - उत्तर प्रदेशची संगम नगरी असलेल्या अलाहाबाद शहराचे नाव बदलण्याच्या निर्णयाला योगींच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून अलाहाबाद शहर प्रयागराज नावाने ओळखले जाईल. मात्र, 444 वर्षांपूर्वीही या स्थानकाचे नाव प्रयागराज असेच होते. त्यावेळी, अकबर बादशहाने या स्थानकाचे नाव बदलून अलाहाबाद असे ठेवले. त्यानंतर पुन्हा या अलाहाबादचे नाव प्रयागराज बनले आहे. 

योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाने अलाहाबाद शहराचे नाव प्रयागराज करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या शहराला पहिलेच नाव मिळाले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या या निर्णयामुळे संत समाज आनंदी झाला आहे. पण, विरोधकांनी या नाव बदलाला आपला विरोध दर्शवला होता. 
इतिहास तज्ञ्ज्ञांच्यामते अकबरनामा, आईने अकबरी आणि अन्य मुगलकालीन इतिहासाच्या पुस्तकांमध्ये अकबरने सन 1574च्या जवळपास प्रयागराज येथे किल्ल्याची पायाभरणी केल्याचे म्हटले आहे. अकबरने येथे नवीन नगर बसवले होते. त्याचे नाव अलाहाबाद ठेवण्यात आले. त्यापूर्वी या शहराला प्रयागराज नावानेच ओळखले जात. तसेच मानचरितमानस या ग्रंथातही अलाहाबादचा उल्लेख प्रयागराज असाच आहे. प्राचीन काळात संगम नदीच्या पाण्याने राजे-महाराजांचा येथे अभिषेक करण्यात येत होता. तर, वाल्मिकी 'रामायण'मध्येही याचा उल्लेख आहे. वनवासाला जातेवेळी श्रीराम यांनी प्रयाग येथील ऋषी भारद्वाज यांच्या आश्रमाल भेट दिली होती. 

प्रभू श्रीराम जेव्हा श्रृंग्वेरपूर येथे पोहोचले होते, तेव्हा तेथेही प्रयागराज हाच उल्लेख आला होता. सर्वाच प्राचीन आणि सत्यवचन असलेल्या मत्यपुराणच्या 102 ते 107 या अध्यायातही या तिर्थाच्या महात्म्याचा उल्लेख आहे. प्रयाग हे प्रजापतीचे क्षेत्र असून येथे गंगा आणि जमुना या नद्या वाहत असल्याचे या अध्यात सांगतिले आहे. 
 

Web Title: Allahabad's name was already 'Prayagraj', 444 years ago Akbar Badshahan changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.