१५ वर्षांपूर्वी युती तोडली, आता पुन्हा एकत्र येणार, बिजद भाजपसोबत एकत्र लढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 01:23 PM2024-03-09T13:23:11+5:302024-03-09T13:24:22+5:30
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक बिजद एनडीएचा घटक पक्ष म्हणून लढणार असल्याची चर्चा आहे.
भुवनेश्वर : भाजपशी सुमारे दशकभर असलेली युती तोडल्यानंतर आता १५ वर्षांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल (बिजद) आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी पुन्हा भाजपप्रणित एनडीएमध्ये सामील होण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक बिजद एनडीएचा घटक पक्ष म्हणून लढणार असल्याची चर्चा आहे.
गेल्या काही वर्षांत बिजद हा पक्ष भाजपविरोधातील एक महत्त्वाचा विरोधी पक्ष म्हणून ओळखला जात होता. सूत्रांनी सांगितले की, एनडीएमध्ये सामील होण्यासाठी बिजद भाजपशी सध्या चर्चा करत आहे. या दोन पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकांसाठी जागा वाटपाचा निर्णयही लवकरच होण्याची शक्यता आहे. बिजद एनडीएमध्ये सामील होण्याची घोषणा लवकरच करण्यात येईल. नितीशकुमार पुन्हा एनडीएमध्ये सहभागी झाले. त्यानंतर बिजदही त्याच दिशेने निघाल्याच्या बातम्या येण्यास सुरुवात झाली.
२०१९ चे लोकसभेचे ओडिशातले निकाल (२१ जागा)
बिजद (४३.३%)
भाजप - (३८.९%)
काँग्रेस -१ (१४%)
ओडिशा विधानसभेच्या १४७ मतदारसंघांमधील स्थिती
बैठका सुरू
एनडीएमध्ये सामील होण्यासंदर्भात ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या निवासस्थानी त्या पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. त्याच विषयाबाबत भाजपचीही दिल्लीमध्ये बैठक पार पडली आहे.