राहुल गांधींकडून आघाडीचे संकेत

By admin | Published: November 17, 2015 02:59 AM2015-11-17T02:59:10+5:302015-11-17T02:59:10+5:30

राजकीय पक्षांसाठी ‘एकला चलो’चा नारा आता भूतकाळात जमा असल्याचे सूचित करीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विविध राज्यांतील निवडणुकांमध्ये युती किंवा

Alliance signs by Rahul Gandhi | राहुल गांधींकडून आघाडीचे संकेत

राहुल गांधींकडून आघाडीचे संकेत

Next

- हरीश गुप्ता,  नवी दिल्ली
राजकीय पक्षांसाठी ‘एकला चलो’चा नारा आता भूतकाळात जमा असल्याचे सूचित करीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विविध राज्यांतील निवडणुकांमध्ये युती किंवा आघाडीचे राजकारण यशस्वी करण्यासाठी मैलांची वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बिहारमध्ये अलीकडेच महाआघाडीत सहभागी झालेल्या काँग्रेसला मिळालेल्या भरघोस यशामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या राहुल गांधी यांनी ‘भूतकाळ मी मागे सोडला आहे’, असे ठामपणे एका उत्तरात सांगितले.
आघाडी किंवा युती स्थापन करण्याबाबत तुम्ही फारसे उत्सुक दिसत नाही, असा थेट प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.
‘एकला चलो रे’च्या राजकारणापासून पूर्णपणे फारकत घेणार असल्याचे संकेत देताना
त्यांनी विधानसभा निवडणुकीत समविचारी आणि धर्मनिरपेक्ष
पक्षांशी युती करण्याची इच्छा
व्यक्त केली. आसाम आणि प. बंगालमध्ये पुढील वर्षी मे- जूनमध्ये विधानसभा निवडणुका असल्याकडे लक्ष वेधण्यात आले असता त्यांनी कोणत्याही राज्यात आघाडी किंवा युतीचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते. तशी शक्यता मी नाकारणार नाही, असे स्पष्ट केले.
काँग्रेसने याआधीच प. बंगालमध्ये डाव्या पक्षांसोबत समन्वय राखण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, तर आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी युती करणार असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. बद्रुद्दीन अजमल यांच्या आॅल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटचे लोकसभेत तीन खासदार असून त्यांच्याशी युती करण्याचे संकेतही त्यांनी दिले.
संघटनात्मक बदल नाही...
राहुल गांधी यांची पक्षाध्यक्षपदी तख्तपोशी आणि काँग्रेसमधील संघटनात्मक बदलाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. सप्टेंबरमध्येच हे बदल होऊ घातले होते.
हे बदल लवकरच होतील मात्र फार मोठे किंवा व्यापक नसतील, असेही त्यांनी सूचित केले. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीत आघाडी स्थापन करीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘इंडिया शायनिंग’च्या नाऱ्यातील हवा काढून घेतली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी डोळ्यासमोर ठेवत राहुल गांधी यांनीही तीच भाषा चालविली आहे.

Web Title: Alliance signs by Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.