गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप
By admin | Published: August 9, 2016 10:00 PM2016-08-09T22:00:52+5:302016-08-09T22:00:52+5:30
जळगाव - तालुक्यातील आव्हाणे येथे नैसर्गिक आपत्तीत मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मदत, अनुदान व शाळकरी विद्यार्थिनींना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
Next
ज गाव - तालुक्यातील आव्हाणे येथे नैसर्गिक आपत्तीत मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मदत, अनुदान व शाळकरी विद्यार्थिनींना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.आव्हाणे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी वीज पडून मयत झालेले रमेश बारेला यांच्या पत्नी गंगुबाई बारेला यांना चार लाख रुपयांचा धनादेश पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी आव्हाणे सरपंच वत्सलाबाई मोरे, कृउबाचे उपसभापती कैलास चौधरी, तरसोदचे सरपंच पंकज पाटील, राजू चव्हाण, सुनिल मोरे, मुख्याध्यापक दत्तात्रय पवार, तहसीलदार अमोल निकम, निवासी नायब तहसिलदार डी.एस. भालेराव, मंडळ अधिकारी पी.डी.मांडे उपस्थित होते. त्यानंतर महाराजस्व अभियानांतर्गत शानुबाई पुंडलिक चौधरी विद्यालयातील विद्यार्थिनींना अधिवास तसेच विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.