चार मार्केटमध्ये दंडाच्या बिलांचे वाटप सुरू

By admin | Published: July 26, 2016 12:04 AM2016-07-26T00:04:09+5:302016-07-26T00:04:09+5:30

जळगाव- फुले मार्केटसह सेंट्रल फुले मार्केट, वालेचा व शास्त्री मार्केटमधील गाळेधारकांना थकीत भाड्याच्या पाचपट दंडासह बिलांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षांच्या थकबाकीची पाच पट दंडासह बिले वाटप केली जात आहेत.

Allocation of penalty bills in four markets | चार मार्केटमध्ये दंडाच्या बिलांचे वाटप सुरू

चार मार्केटमध्ये दंडाच्या बिलांचे वाटप सुरू

Next
गाव- फुले मार्केटसह सेंट्रल फुले मार्केट, वालेचा व शास्त्री मार्केटमधील गाळेधारकांना थकीत भाड्याच्या पाचपट दंडासह बिलांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षांच्या थकबाकीची पाच पट दंडासह बिले वाटप केली जात आहेत.

घरप˜ी बिल होणार ऑनलाईन
जळगाव- मनपाच्या घरप˜ीचे बिल ऑनलाईन मिळण्याची व ते ऑनलाईन भरण्याची सोय पुढील वर्षापासून उपलब्ध होणार आहे. यासाठी आयसीआयसीआय बँकेने ऑनलाईन सिस्टीमची सोय करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर कर भरणा देखील ऑनलाईन करण्यात येणार आहे. त्यासोबतच प्रभाग समिती कार्यालयात जाऊन बिल भरण्याची सोय देखील उपलब्ध राहणार आहे.

५ झाडे लावण्याच्या अटीचे नागरिकांकडून होतेय पालन
जळगाव- एखादे झाड तोडायचे असेल तर त्याची परवानगी देताना संबंधीत नागरिकाला ५ झाडे लावण्याची सक्ती मनपाकडून केली जात आहे. विशेष म्हणजे त्याचे नागरिकांकडून पालनही केले जात असल्याने मनपाने मागवलिेल्या अहवालावरून दिसून येत आहे. नागरिक झाडे तोडण्याची परवानगी मागतानाच पाच झाडे देखील लावण्याची तयारी करतील असल्याचे दिसून आले आहे.

Web Title: Allocation of penalty bills in four markets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.