न्याय देणं शक्य नसल्यास इच्छामरणाची परवानगी द्या; महिलेनं रक्तानं लिहिलं मोदींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2018 17:25 IST2018-06-09T17:25:46+5:302018-06-09T17:25:46+5:30
पोलीस स्टेशनमध्येही तिला आपमानजनक वागणूक मिळाल्याचा दावा केला आहे.

न्याय देणं शक्य नसल्यास इच्छामरणाची परवानगी द्या; महिलेनं रक्तानं लिहिलं मोदींना पत्र
लखनऊ - उत्तर प्रदेशमधील एका महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रपती रामनाद कोविद यांना पत्र लिहून न्याय देणं शक्य नसल्यास इच्छामरणाची परवानगी द्या अशी मागणी केली आहे. त्या महिलेने हे पत्र रक्ताने लिहले आहे.
इटावामधील बकेवर कस्ब्यातील ही महिला आहे. या ठिकाणी या महिलेची जमीन आहे. आपल्या जमिनीवर बांधकाम करण्यासाठी महिला ज्यावेळी गेली त्यावेळी भाजपचा नेता लालजी शर्माने तिला तेथून हुसकावलं आणि परत न येण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस स्टेशनमध्येही तिला आपमानजनक वागणूक मिळाल्याचा दावा केला आहे.
या महिलेने राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना रक्ताने पत्र लिहून न्याय मागितला आहे. तसेच न्याय देणे शक्य झालं नाही तर मला इच्छामरणाची परवानगी मिळावी, असं या महिलेने पत्रात म्हटलं आहे.
पीडित महिलेने अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी फेऱ्या मारूनही काही फायदा झाला नाही. अखेर न्यायासाठी महिलेने राष्ट्रपती, पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी चिठ्ठी लिहीत न्यायाची मागणी केली.