Sonia Gandhi : आपात्कालीन वापरासाठी इतर लसींना परवानगी द्या, साेनिया गांधींचे पंतप्रधानांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 04:51 AM2021-04-13T04:51:46+5:302021-04-13T04:52:16+5:30

Sonia Gandhi : साेनिया गांधी यांनी काॅंग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसाेबत आढावा घेऊन काेराेनाच्या परिस्थितीची माहिती घेतली. त्याचा उल्लेख त्यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.

Allow other vaccines for emergency use, Sonia Gandhi letter to the Prime Minister | Sonia Gandhi : आपात्कालीन वापरासाठी इतर लसींना परवानगी द्या, साेनिया गांधींचे पंतप्रधानांना पत्र

Sonia Gandhi : आपात्कालीन वापरासाठी इतर लसींना परवानगी द्या, साेनिया गांधींचे पंतप्रधानांना पत्र

googlenewsNext

नवी दिल्ली : काेराेनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करतानाच काॅंग्रेसच्या अध्यक्ष साेनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पत्र पाठवून लसींना लवकर परवानगी देण्याची मागणी केली आहे. याशिवाय साेनियांनी आयुष्य वाचविणाऱ्या औषधांवरील ‘जीएसटी’ रद्द करावा तसेच पात्र कुटुंबांच्या खात्यात थेट ट्रान्सफरद्वारे सहा हजार रुपये तत्काळ जमा करावे, या प्रमुख मागण्याही केल्या आहेत.
साेनिया गांधी यांनी काॅंग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसाेबत आढावा घेऊन काेराेनाच्या परिस्थितीची माहिती घेतली. त्याचा उल्लेख त्यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. 

साेनियांनी लिहिले, की बहुतांश राज्यांमध्ये ३ ते ५ दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा आहे. त्यामुळे एकीकडे स्थानिक उत्पादन क्षमता वाढविणे आवश्यक असून, इतर लसींच्याही आपात्कालीन वापरास लवकरात लवकर परवानगी द्यावी. साेनिया गांधींनी महाराष्ट्रातील लस उपलब्धतेबाबतही मुद्दा पंतप्रधानांकडे मांडला. लसपुरवठ्याचे धाेरण सरसकट सर्व राज्यांसाठी समान असायला नकाे. लाेकसंख्येनुसार लस पुरवठा व्हावा, असे साेनिया गांधींनी म्हटले आहे. तसेच व्हेंटिलेटर्स, ऑक्सिमीटर्स तसेच ऑक्सिजन सिलिंडरवरही जीएसटी आकारण्यात येऊ नये, असे साेनियांनी म्हटले आहे.

लसी पुरवण्यातील अपयश झाकण्यासाठी  भाषणबाजी -चिदंबरम
- केंद्र सरकार राज्यांना लसींचा पुरवठा आणि वाटप नीटपणे करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले.  हे अपयश झाकण्यासाठीच सरकार आता पोकळ भाषणबाजी करीत आहे. परंतु अशाने कोरोनाविरोधातील लढाईत यश मिळणार नाही, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केली. यासंदर्भात केंद्र सरकारवर टीका करताना राज्यसभा खासदार असलेल्या चिदंबरम यांनी अनेक ट्विट पोस्ट केल्या. 

 

Web Title: Allow other vaccines for emergency use, Sonia Gandhi letter to the Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.